घरक्राइमभाभा अणूसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाने संपवले आयुष्य, कारण अद्यापही अस्पष्ट

भाभा अणूसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाने संपवले आयुष्य, कारण अद्यापही अस्पष्ट

Subscribe

मुंबईतील भाभा अणूसंशोधन केंद्रातील एका शास्त्रज्ञाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनिष सोमनाथ शर्मा (वय वर्ष 50) असे आत्महत्या केलेल्या शास्त्रज्ञाचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई : नैराश्यात जाऊन अनेक लोक टोकाची पाऊले उचलताना दिसून येत आहेत. त्यातच आता मुंबईतील भाभा अणूसंशोधन केंद्रातील एका शास्त्रज्ञाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनिष सोमनाथ शर्मा (वय वर्ष 50) असे आत्महत्या केलेल्या शास्त्रज्ञाचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारी (ता. 28 ऑगस्ट) दुपारी मनिष यांनी घरातील पंख्याला गळफास घेत स्वतःचे जीवन संपवल्याचे सांगण्यात आलेले आहे. (Bhabha Atomic Research Center Scientist commits suicide)

हेही वाचा – पहाटे गाढ झोपेत कुटुंबावर काळाचा घाला, चिखलीत आगीत होरपळून चौघांचा मृत्यू

- Advertisement -

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ असलेले मनिष शर्मा हे BARC कॉलनीमध्ये आपली पत्नी आणि मुलासह वास्तव्यास होते. परंतु, सोमवारी (ता. 28 ऑगस्ट) दुपारी त्यांची पत्नी आणि मुलगा काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता त्यांनी गळफास घेतला. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान मनिष यांची पत्नी आणि मुलगा घरी आले असता, त्यांना त्यांचा मृतदेह नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने पंख्याला लटकलेला असल्याचे दिसले. यानंतर शेजाऱ्यांच्या साहाय्याने घराचा दरवाजा तोडून त्यांच्या कुटुंबियांनी मनिष यांना ट्रॉम्बे येथील BARC रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मनिष यांना मृच घोषित केले. रुग्णालयात नेण्याआधीच मनिष यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे ट्रॉम्बे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांना मनिष शर्मा यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली असून “मी माझे आयुष्य संपवत आहे, त्यासाठी मला माफ करा.” असे यामध्ये लिहिले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, मनिष शर्मा यांना मानसिक आजार होता. मागच्या 20 वर्षांपासून त्यांची ट्रिटमेंट BARC रुग्णालयात सुरू होती, असे एका इंग्रजी वृत्तपत्राकडून सांगण्यात आले आहे. परंतु, तरी देखील पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यात येत आहे.

- Advertisement -

सप्टेंबर 2021 मध्ये देखील भाभा अणुसंशोधन केंद्रातील एका शास्त्रज्ञाने कॉम्प्लेक्समधील हेलियम प्लांटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने तेव्हा सांगितले होते की, चंपालाल प्रजापती (वय वर्ष 44) या तांत्रिक भौतिकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञाने आत्महत्या केली. ते मूळचे सुजानगड, राजस्थानचे रहिवासी होते आणि सुपरकंडक्टरमध्ये पारंगत होते. घटनेच्या दिवशी ते वेळेत घरी न पोहोचल्याने त्यांच्या पत्नीने सहकाऱ्यांना फोन केला असता त्यांना प्रजापती हे एका ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत सापडले. त्यामुळे कामाचा ताण अधित असल्याने शास्त्रज्ञ असे पाऊल उचलत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -