घरलाईफस्टाईलDecorating Tips : पूजेचे ताट 'असे' सजवा

Decorating Tips : पूजेचे ताट ‘असे’ सजवा

Subscribe

प्रत्येकजण आपापल्या घरी सगळ्या प्रकारचे सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. अशातच आपल्या कडे पूजेला छान ताट सजवले जाते. तसेच देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आरतीसाठी छान आरतीचे ताट सजवले जाते. आता आपण पाहूया पूजेला लागणारे ताट आपण घरच्या घरी कशा पद्धतीने छानपैकी सजवू शकतो ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने…

Decorative pooja thali /Aarti thali (design 2) - YouTube

- Advertisement -

आरशाने सजवा

बाजारात अनेक प्रकारच्या काचांनी सजवलेली ताटे उपलब्ध आहेत. आणि हे ताट न घेता तुम्ही रंगीबेरंगी काचा देखील विकत घेऊ शकता. तसेच त्याच्या मदतीने, तुम्ही तुमचे ताट सजवू शकता. हे ताट दिसायला देखील खूप सुंदर दिसतात. तसेच तुम्ही तुमच्या ताटावर आरसे चिकटवू शकता. जर का तुम्हाला असे ताट सजवायचे असेल तर हे खूप सोपे आहे आणि सजावटीची ही पद्धत सणाच्या दिवसात खूप सुंदर दिसते.

रंगांनी सजवा

तुम्ही पूजेचे ताट सजवण्यासाठी रंगही वापरू शकता. यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे रंग वापरावे लागतील. त्याच्या मदतीने तुम्ही पूजेचे ताट छानपैकी सजवू शकता.

- Advertisement -

मण्यांनी सजवा

जर का तुम्ही बाजारात डिझायनर ताट विकत घ्यायला गेल्यात तर साधारण दोन हजार रुपयांना ते मिळते. मात्र, तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे पूजेचे ताट स्वतः घरीच सजवू शकता. ते देखील खूप सुंदर दिसते. तसेच याचा खर्च देखील वाचेल.

फुलांनी सजवा

तुम्ही तुमच्या पजेचे ताट फुलांच्या साहाय्याने सजवू शकता. ते खूप सुंदर दिसते. जर वेळ कमी असेल तर, आपण फुलांच्या मदतीने आपले ताट सहजपणे सजवू शकता. अशातच तुम्ही हे ताट वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी सजवू शकता आणि त्यामुळे हे घरच्या घरी बनवलेले ताट दिसायला देखील सुंदर आणि आकर्षित होईल. तसेच पूजेसाठी हे ताट योग्य देखील आहे. कारण यामध्ये नैसर्गिक फुलांचा यामध्ये समावेश आहे.


हेही वाचा : जुन्या टोपल्यांपासून बनवा श्री कृष्णासाठी पाळणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -