घरलाईफस्टाईलवयाच्या पस्तीशीनंतर खाऊ नका हे पदार्थ

वयाच्या पस्तीशीनंतर खाऊ नका हे पदार्थ

Subscribe

वेळ आणि वयानुसार आपली आवड-निवड बदलत राहते. त्याच प्रकारे शरीराच्या गरजा बदलत राहतात. आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीराला वयाच्या प्रत्येक पायरीवर विविध खाद्यपदार्थांची गरज असते. यामुळे वयासोबतच आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. 30 वर्षांच्या वयानंतर शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. लवकर थकवा येतो आणि तुम्ही जीवनातील परिपक्व पायरीवर प्रवेश करता. हाडांमधील कॅल्शियम कमी होते. केस पांढरे होतात आणि रक्तप्रवाहाच्या समस्या होतात.

बटर

यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅटचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट वाढते. वयाच्या तीशीनंतर यापासून दूर राहणेच आरोग्यसाठी चांगले राहील.

- Advertisement -

फास्ट फूड

तुम्हाला असे पदार्थ सेवन करताना चांगले लागत असतील परंतु याच्या सेवनापासून दूर राहा. अन्यथा तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. अशा फूडमध्ये जास्त ऊर्जा नसते.

अधिक मीठ

वाढत्या वयात रक्तप्रवाह वाढण्याची समस्या होते. यामुळे कमी प्रमाणात मीठाचे सेवन करा. हृदय आणि मुत्रपिंड निरोगी राहील.

- Advertisement -

जास्त साखर

जास्त साखरेचे सेवन करणे कधीच फायदेशीर नसते. यामुळे पस्तिशीनंतर साखरेचे सेवन कमी करा. यामुळे मधुमेहाची समस्या कमी होते.

तळलेले पदार्थ

जास्त तेलकट भोजन केल्याने शरीरात चरबी वाढते. यामुळे तुम्हाला जास्त वर्कआऊट करावे लागते. जे तुम्ही तुमच्या वयानुसार करु शकत नाही आणि त्यामुळे शरीराला नुकसान होते.

जास्त वाईन पिऊ नका

वाईनचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे हृदय आणि लिव्हरवर वाईट परिणाम होतो. अशाने आरोग्य खराब होते.

कॅफीन

वयाच्या पस्तीशीनंतर तणाव जास्त असतो. अशात कॅफीनला चहा किंवा कॉफीच्या रुपात सेवन करणे तुमच्यासाठी हानीकारक ठरु शकते.

पांढरे ब्रेड

पांढरे ब्रेड मैद्याने तयार होतात. पांढर्‍या ब्रेडच्या अती सेवनाने पोटात बध्दकोष्ठ किंवा अपचनाची समस्या होऊ शकते. व्हाईट ब्रेडचे सेवन करण्यापासून दूर राहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -