घरमहाराष्ट्रसुरक्षा रक्षकाने जोपासली चित्रकला

सुरक्षा रक्षकाने जोपासली चित्रकला

Subscribe

सावकाराकडून पलायन चित्रांसाठी सोन्या-चांदीचे ब्रश

पिंपरी-चिंचवड:-लहानपणी चित्रकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. पण वडिलांनी सावकाराकडून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यासाठी त्याला सावकाराकडे तारण ठेवले. दोन वर्षांनंतर तो सावकाराच्या तावडीतून पळून गेला. मात्र चित्रकार होण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने सुरक्षा रक्षकाची नोकरी पत्करली. नोकरी करत असताना सेलिब्रेटींची चित्रे रेखाटून हणमंत शिंदे आपली आवड आजही जोपासत आहेत. चित्र काढण्यासाठी त्यांनी चक्क सोन्या, चांदीचे ब्रशही बनवून घेतले आहेत.

हणमंत शिवाजी शिंदे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगाव येथील रहिवासी आहेत. ते गेल्या ८ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांना पहिल्यापासून चित्रकलेची आवड असून स्वतःच्या चित्रांचे प्रदर्शन आर्ट गॅलरीत भरवण्याचं स्वप्न त्यांनी बाळगले होते. परंतु गरिबीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. अनेकदा त्यांची गरिबी त्यांच्यापुढे आडवी आली.

- Advertisement -

हणमंत शिवाजी शिंदे हे विद्यार्थीदशेत असताना शेजारील मुलाने चित्र काढले होते. ते पाहून हणमंत हे प्रभावित झाले आणि चित्र काढायला सुरुवात केली. घरातील परिस्थिती बेताची असल्याने शेतमजुरी करून हणमंत यांचे वडील घर चालवायचे. इयत्ता ६ वीमध्ये असताना वडिलांनी दहा हजार रुपये कर्ज सावकाराकडून घेतले आणि हणमंत शिंदेला सावकाराकडे तारण ठेवले. दोन वर्षानंतर हणमंत हे त्यांच्या तावडीतून पळून आले आणि स्वतःची सुटका करून घेतली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी आईस्क्रीम विकून स्वतःच शिक्षण पूर्ण केलं. चित्रकला शिक्षक व्हायचं होतं, पण ते सत्यात उतरलं नाही. त्यामुळे हणमंत शिंदे नैराश्यात गेले होते,त्यावेळी त्यांनी आत्महत्या करायचं ठरवलं होतं.

त्यानंतर स्वतः सावरत त्यांनी काही महिन्यांनी विवाह केला. पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात मोठा चित्रकार होण्याचे स्वप्न बाळगू लागले आणि शहरात स्थायिक झाले. नोकरी नसल्याने त्यांना खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम सुरू केलं. येणार्‍या पैशातून संसार आणि चित्रकलेची आवड जोपासली. त्यांनी सोने आणि चांदीचा वापर करत ब्रश तयार केले. त्यांनी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची चित्रे साकारली आहेत.

- Advertisement -

तसेच जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, सुपर स्टार रजनीकांत, अमीर खान, अक्षय कुमार, पार्थ भालेराव, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, सचिन तेंडुलकर यांची चित्रे शिंदे यांनी काढली असून त्यावर त्यांच्या सह्यादेखील घेतल्या आहेत.

प्रत्येक महिलेची इच्छा असते की, पतीने सोन्याचे दागिने करावेत. मलादेखील असे वाटत होते. त्यांनी सोन्या-चांदीचा ब्रश बनवला त्याचा मला आनंद आहे. कारण त्यांनी सेलिब्रिटींची चित्रे त्यामधून साकारली असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माझ्या पतीचा मला अभिमान आहे. मला सोन्याचा दागिना मिळाला नाही तरी चालेल.
-सुनीता हणमंत शिंदे, पत्नी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -