Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल प्लास्टिकचे ग्लास फेकून देऊ नका, तर करा 'असा' वापर

प्लास्टिकचे ग्लास फेकून देऊ नका, तर करा ‘असा’ वापर

Subscribe

प्लास्टिक आजकाल सगळेच लोक सर्रास वापरताना दिसतात. आणि या प्लास्टिकमूळे पर्यावरणाला धोका पोहचतो. अशातच जर का तुम्ही प्लास्टिकचे ग्लास फेकून देत असाल तर यामुळे पर्यावरण दूषित होते. ज्यामुळे वातावरण दूषित होते. अशातच प्लॅस्टिकच्या ग्लासेसचाही आपण पुनर्वापर करू शकतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. तसेच याचा वापर कसा करायचा हे ‘या’ टिप्सच्या माध्यमातून जाणून घेऊया….

कुंडी म्हणून प्लास्टिकचा ग्लास वापरा

प्रत्येकाला घरात रोपे लावायला आवडतात. अशातच भांड्यांचा खर्च वाचवायचा असेल तर प्लास्टिकचा ग्लास वापरा. पण हे ग्लास वापरून झाल्यावर या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये माती टाकून छोटी रोपटे लावा. तसेच या ग्लासला सुंदर लुक देण्यासाठी तुम्ही त्यावर पेंटही करू शकता.

पेंटिंगसाठी प्लास्टिकचे ग्लासेस वापरा

- Advertisement -

तुम्हाला लहान घरगुती वस्तू रंगवायच्या असतील किंवा लहान मुलांना काही वस्तू बनवायच्या असतील तर तुम्ही या प्लास्टिक ग्लासचा पुनर्वापर करू शकता. तसेच कोणत्याही लहान गोष्टी पेन, पेन्सिल, खडू ठेवण्यासाठी या प्लास्टिक ग्लासचा वापर तुम्ही सहज करू शकतात.

प्लास्टिकच्या ग्लास पासून बॉक्स बनवा

एखादा बॉक्स बनवण्यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करू शकतात. या बॉक्स मध्ये रोज लागणाऱ्या वस्तू यामध्ये नीट ठेवू शकतात. तसेच यावर झाकण म्हणून प्लास्टिकचे कोणतेही झाकण ठेवू शकतात. मेकअपच्या किंवा इतर छोट्या गोष्टी तुम्ही यामध्ये व्यवस्थित लावून ठेवू शकता.

स्टडी टेबलवर प्लास्टिकचे ग्लास ठेवा

- Advertisement -

अनेकजण अभ्यासाच्या टेबलावर लहान डस्टबिन ठेवतात. पण हे चुकीचे आहे. यावर तुम्ही प्लास्टिकचे ग्लास देखील ठेवू शकतात. या ग्लासमध्ये कागदाचे छोटे तुकडे या ग्लासमध्ये टाकू शकतात. आणि हे ग्लास डस्बीन म्हणून वापरा. यामुळे तुमचे ग्लास देखील फुकट जाणार नाही. आणि स्टडी टेबलवर कोणत्याही प्रकारचा कचरा सुद्धा होणार नाही.


हेही वाचा :  बाथरुमच्या टाइल्स अशा करा स्वच्छ…

- Advertisment -