घरलाईफस्टाईलसुरकुत्या विरहीत चमकदार त्वचेसाठी

सुरकुत्या विरहीत चमकदार त्वचेसाठी

Subscribe

आज प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेक जण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर लक्ष न दिल्याने अनेक जणांची त्वचा निस्तेज दिसायला लागते.

तसेच चेहर्‍यावर सुरकुत्याही लवकर दिसायला लागतात. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुमची त्वचा निरोगी बनण्यासोबतच सुरकुत्या विरहीत चमकदार दिसण्यास नक्कीच मदत होईल.

* ज्वारीचे पीठ, हळद आणि मोहरीचे तेल पाण्यामध्ये एकत्र करून उटणे बनवून घ्यावे. या उटण्याने रोज शरीराची मालिश केल्याने त्वचेचा पोत सुधारतो. तसेच रंग उजळण्यास मदत होते.

- Advertisement -

* त्वचा उत्तम राहण्यासाठी संत्र्याचे ज्यूस प्यावे. संत्र्याची साल कोरडे करून त्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते.

* मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून चेहर्‍यावर लावल्यास चेहर्‍याचा रंग उजळतो. तेलकटपणा कमी होतो. पिंपल्सचा त्रास कमी होतो. चेहरा उजळण्यास देखील मदत होते.

- Advertisement -

* दोन चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद चेहर्‍यावर लावल्यास फायदा होतो.

* साधारण चार चमचे मुलतानी माती, दोन चमचे मध, दोन चमचे दही आणि एका लिंबाचा रस एकत्र करून साधारण अर्धा तास चेहर्‍यावर लावून ठेवावा आणि धुवून टाकावा.

* रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचे ज्यूस प्यायल्याने चेहर्‍याचा रंग उजळण्यास मदत होते.

* कडूलिंबाच्या पानामुळे त्वचेची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. याच्या वापरामुळे चेहर्‍यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. साधारण चार-पाच कडूलिंबाची पाने मुलतानी मातीमध्ये एकत्र करून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले बारीक करून घ्यावे. तयार झालेला हा लेप चेहर्‍यावर १५ मिनिटे लावून ठेवून चेहरा धुवावा.

* तुमच्या चेहर्‍यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेहर्‍यावर अर्धा तास लावून ठेवल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

* चेहर्‍याची चमक वाढवण्यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेहर्‍यावर लावावा.

* चेहर्‍याचा सावळेपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर ठरतो. काकडीचा रस काढून साधारण १५ मिनिटे     चेहर्‍यावर लावून धुतल्यास चेहरा चमकण्यास सुरुवात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -