घरमुंबईवसईतील 98 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाची देशसेवा सुरूच

वसईतील 98 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाची देशसेवा सुरूच

Subscribe

वसई: वयाच्या 98 वर्षातही न थकता देशसेवेचे कार्य सुरूच ठेेवणार्‍या वसईतील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र बाळाजी भिसे यांचा ‘आमची वसई’ संस्थेने सत्कार केला.भिसे गुरुजी हे वसईतील सर्वात जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत.वयाच्या 98 व्या वर्षीही ते चालतात,फिरतात आणि स्वतःचे स्वतः काम करतात.इतकेच नव्हे तर सूर्य नमस्कारही घालतात.तसेच आजच्या युवकांना यशस्वी जीवन आणि सदृढ आरोग्यासाठी व्यसन,क्रोध,लोभ आणि अतिआहारापासून दूर राहण्याचेही ते सतत मार्गदर्शन करीत असतात.नित्य योगा करा,सत्याच्या मार्गाने चाला आणि देशसेवा हीच ईशसेवा माना, असा संदेशही ते फेरफटका मारताना वाटेत भेटणार्‍यांना देत असतात.

1 एप्रिल 1921 साली पुणे येथे जन्मलेले भिसे गुरुजी 38 साली न्यु इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला.स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे 16 सप्टेंबरला 1942 ला त्यांना अटक करून येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते.साडेतीन महिन्यांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली.त्यानंतर 1946 ला एस.पी.कॉलेज पुणे येथून बी.एस्सी.,1948 ला एम.एस्सी.आणि त्यानंतर बीटी पदवी घेऊन त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. चिंचवड,रायगड,ठाणे येथे त्यांनी विविध शाळा सुरू केल्या. वसईत आल्यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि निर्मळ विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा दिली.

- Advertisement -

टपाल तिकीटे,नाणी गोळा करणे आणि गणिते सोडवण्याचा छंद त्यांनी आजही जोपासला आहे.त्यांच्या या कार्याने प्रेरीत होऊन ‘आमची वसई’ या सामजिक संघटनेने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपत्राने सत्कार केला. शिलजा जांभेकर,अ‍ॅड.योगेश दास,रुग्णमित्र राजेंद्र ढगे,अमेय तावडे,आपुलकी सेवा संस्थेच्या साधना ऑगस्टीन,अल्बेन लोपीस,पं.हृषीकेश वैद्य यांनी यावेळी उपस्थित राहून भिसे गुरुजींना शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -