घरलाईफस्टाईलइंदुरी उपवासाचे चाट

इंदुरी उपवासाचे चाट

Subscribe

उपवासाच्या रेसिपी

उपवास करणाऱ्या व्यक्तीला सातत्याने भूक लागत असते. अशावेळी वेफर्स आणि इतर पेयाचे सेवन करुन देखील पोट भरत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोट भरणाऱ्या उपवासाच्या रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

  • वाटीभर शिंगाडा पीठ
  • तिखट
  • मीठ
  • गरजेनुसार पाणी
  • २ चमचे गरम तूप
  • दीड वाटी भिजलेला साबुदाणा
  • साखर
  • चिरलेली हिरवी मिरची
  • कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ एकत्र करावे. त्यात पाणी घालून शेवेच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात २ चमचे गरम तूप घालावे. तूप लावून मळून घ्यावे. त्यानंतर तुपात मंद गॅसवर कढईत शेव पाडून खमंग तळावी. त्यानंतर भिजलेला साबुदाणा, मीठ, साखर, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घालून एकत्र करावी. त्यानंतर कढाईत तूप घालून साबुदाणा टाकावा. मीठ, साखर, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मंद गॅसवर परतवून कोथिंबीर घालावी. प्रथम शिंगाड्याचे शेव, त्यावर उकडलेल्या बटाट्याचा कीस, दाण्याचे कूट, चिमूटभर मीठ, तयार साबुदाणा, बटाटा सली, ओले खोबरे, काजू, बेदाणे, २ चमचे दही घालावे आणि वरुन कोथिंबीर आणि चाट मसाला भुरभुरुन इंदुरी उपवासाचे चॅट सर्व्ह करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -