घरलाईफस्टाईलखमंग काजूची उसळ

खमंग काजूची उसळ

Subscribe

काजूची उसळ रेसिपी

बऱ्याचदा त्याच त्याच भाज्या खाऊन फार कंटाळा येतो. अशावेळी जर खमंग अशी काजूची उसळ जेवणात असेल तर जेवायला अधिकच रंगत येते. चला तर आज पाहुया खमंग काजूच्या उसळीची रेसिपी

साहित्य

- Advertisement -

दीड कप ओले काजू
२ मध्यम कांदे
४ लसणीच्या पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा चिंचेचा कोळ किंवा २ कोकम
१/४ कप ओलं खोबरं
कोथिंबीर सजावटीसाठी
मीठ
आवडत असल्यास गूळ किंवा साखर
फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल
१ चमचा हळ्द
१/४ चमचा हिंग
२ चमचे मोहरी

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम ओले काजू वापरणार असाल तर थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे साले सहज निघून येतील. साले काढून काजू पाण्यात स्वच्छ चोळून धुऊन घ्यावेत. त्यानंतर कांदा बारीक चिरावा आणि लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात, मिरच्या चिरून घ्याव्यात. त्यानंतर कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी तडतडू द्यावी. मग हळ्द आणि हिंग घालावे. नंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसूण लाल होऊ देउ नये. लगेचच कांदा घालून लाल होईपर्यंत परतावा. मग काजू घालून जेवढी पातळ उसळ हवी तेवढे पाणी घालावे. काजू व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण ठेवावे. आता त्यात गरम मसाला, चिंच किंवा कोकम, मीठ, गूळ घालाव. त्यानंतर खोबरं घालून ढवळावे आणि वर कोथिंबीर पेरून पोळी किंवा भाकरी किंवा भाताबरोबर ओल्या काजूची उसळ वाढावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -