घरलाईफस्टाईलस्वयंपाक घरातील महत्त्वाच्या टीप्स

स्वयंपाक घरातील महत्त्वाच्या टीप्स

Subscribe

झटपट ‘किचन टीप्स’

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
  • लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर सुद्धा ही पेस्ट फ्रिजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते.
  • आल्याचे वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे करावे त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करुन फ्रिजमधे ठेवल्यास आठवडाभर छान टिकते.
  • हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस आणि मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो.
  • टोमॅटो प्यूरीसाठी निवडक चांगल्या प्रतीचे लालभडक टणक टोमॅटो घेउन ते गॅसवर पाच मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा. थंड झाल्यावर सालं काढून मिक्सरला प्युरी करून घ्या. या प्युरीत थोडे व्हिनेगर घालून फ्रिजमध्ये ठेवावे. ७-८ दिवस झकास टिकते. (व्हिनेगर नसल्यास टोमटोची ही प्यूरी फ्रिजरमधे हवाबंद डब्यात ठेवावी)
  • पुरणपोळी करणं म्हणजे गृहिणीचं कसब असतं. कणीक आणि पुरण एकसारखंच मऊ असावं. कणीक मळून झाल्यावर एका पसरट पातेल्यात घेऊन ती बोटांनी दाबून घ्यावी आणि त्यावर भरपूर तेल ओतून झाकून ठेवावी. पोळी करताना तेलातून काढून ती चांगली तिंबून घ्यावी. हवी तशी पोळी लाटता येते आणि पुरणही बाहेर येत नाही.
  • पुरणपोळीचं पुरण अगदी सैल झालं असेल तर त्यात दोन चिमूट खायचा सोडा घालून पातेलं गॅसवर ठेवून थोडं गरम करा म्हणजे ते घट्ट होईल. किंवा एका स्वच्छ जाड कापडावर काही वेळासाठी पसरून ठेवा. अगदी सोपं म्हणजे थोडं डाळीचं पीठ खमंग भाजून पुरणात मिक्सस करा.
  • पोळी लाटताना पोळपाटावर स्वच्छ कापड टाकून त्यावर नेहमीसारखी पोळी लाटावी म्हणजे पोळपाटाला चिकटत नाही.
  • मिक्सरच्या ग्राइन्डरमधे वेलदोड्यांची पावडर करताना कितीही फिरवला तरी बारिक होत नाही,म्हणून आख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपात परतुन टम्म फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली आणि मग ग्राइन्डरमधे फिरवले तर त्यांची पटकन बारिक पावडर होते आणि स्वादही छान येतो.
  • बटाटे उकडायचे असतील तर ते धुवून घेऊन त्यांना टोचे मारून ५ मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे. एकदा उलट-पालट करायचे. मग फ्रीजमध्ये ठेवुन द्यायचे. गार झाले की सालं पटकन निघतात.
  • बदामाची सालं काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे. आधी भिजवले नसले तरी मऊ होतात आणि सालं काढता येतात.
  • बेसन आणि रवा गॅसवर भाजायला जेवढं तूप लागतं त्याच्या १/३ तुपात मायक्रोमध्ये भाजता येतात.
  • लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पाव-भाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळूनही येते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -