घरमनोरंजनमहेश भट यांची दोन तास पोलिसांकडून चौकशी

महेश भट यांची दोन तास पोलिसांकडून चौकशी

Subscribe

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट यांची सोमवारी वांद्रे पोलिसांकडून तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांची जबानी नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. मात्र, सुशांत, त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यासह इतर विषयांवर ही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजता महेश भट हे सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांच्यासह इतर दोन पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते. सुशांत आणि रिया यांच्या रिलेशनसह इतर विषयांवर त्यांची चौकशी करण्यात आली होती. महेश भट यांच्या सडक दोन या चित्रपटासाठी सुरुवातीला सुशांत आणि रिया यांना घेण्यात आले होते. मात्र, ऐनवेळेस सुशांतला काढून दुसर्‍या अभिनेत्याला घेण्यात आले, रियासाठी त्याने प्रयत्न केले.

- Advertisement -

मात्र, रियाच्या जागी महेश भट्ट यांनी त्यांची मुलगी आलिशा भट हिची निवड केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या चौकशीचा तपशील उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. लवकरच करण जोहरसह त्याच्या मॅनेजरची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यानंतर इतरांची एक यादी पोलिसांनी काढली असून त्यांना चौकशीसाठी समन्स पाठविले जातील, असे पोलिसांनी सांगितले. सुशांतच्या आत्महत्येचा तपास अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचा एक अहवाल पोलीस आयुक्तांसह गृहमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -