घरलाईफस्टाईलभन्नाट किचन टीप्स

भन्नाट किचन टीप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • चहा करताना किसलेले आलं शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो.
  • इडली, डोसा आणि आप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळ यांच्यासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा. यामुळे पोष्णमूल्य वाढते.
  • अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिऱ्यात घाला. यामुळे आंबटपणा येत नाही. शिवाय इसेन्सही घाला.
  • कणिक भिजवताना अर्ध पाणी अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात. तसेच रंगही चांगला येतो.
  • पुऱ्या करताना पिठात दोन चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो. चवही चांगली येते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -