घरलाईफस्टाईलथंडीत त्वचेसाठी करा हे खास उपाय

थंडीत त्वचेसाठी करा हे खास उपाय

Subscribe

थंडीच्या दिवसात हमखास त्वचा कोरडी, निस्तेज किंवा खरखरीत होते.त्यासाठी काही घरगुती उपायांनी सुद्धा तुम्ही यावर मात करू शकता आणि थंडीपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करू शकता.

*घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच.

- Advertisement -

*आंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा.

*हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे.

- Advertisement -

*पिकलेल्या पपईचा गर चेहर्‍यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो.

* त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहर्‍यावर लावल्यास चेहर्‍याचा काळवंडलेपणा कमी होतो.

*रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज मिळतं.

*लिंबूरस, गुलाबपाणी आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन रोज सकाळी आंघोळीनंतर हातापायांना लावा दिवसभर त्वचा मऊ राहते.

*हिवाळ्यामध्ये तळपायांना, विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरूक्षता वाढल्याने भेगांमधून रक्त येणे यासुद्धा तक्रारी आढळतात.अशावेळी तळपायांना कोकमाचे तेल लावणे, फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायात मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हे सुद्धा उपयोगी ठरते.

* रात्री बदाम भिजवून , सकाळी त्याची सालं काढून , पेस्ट करून ती संत्र्याच्या रसात मिक्स करून लावावी.

*खोबरेल तेल ,अ‍ॅरोमा किंवा तिळाच्या तेलानं मसाज करून आंघोळ करणं हा उपाय सर्वोत्तम आहे.तेवढा वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलंही तेल थोड्या प्रमाणात घालावं. म्हणजे त्वचेचं आपोआप मॉइश्चरायझिंग होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -