घरलाईफस्टाईलमायग्रेन ठरते डोकेदुखी

मायग्रेन ठरते डोकेदुखी

Subscribe

मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयात होतो. हार्मोन्समध्ये निर्माण होणार्‍या बदलांमुळे आणि असंतुलनामुळे मायग्रेनचा त्रास होण्यास सुररवात होते.तसेच पुरुषांच्या तुलनेपेक्षा स्त्रियांमध्ये मायग्रेनच्या त्रासाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते.

सध्या मायग्रेनच्या त्रासामुळे अनेक तरुण-तरूणी त्रस्त झाले आहेत. मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयात होतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत हा त्रास उद्भवतो. तर काहींना अनुवांशिकतेमुळे देखील याचा त्रास होतो. हार्मोन्समध्ये निर्माण होणार्‍या बदलांमुळे आणि असंतुलनामुळे मायग्रेनचा त्रास होण्यास सुररवात होते. तसेच पुरुषांच्या तुलनेपेक्षा स्त्रियांमध्ये मायग्रेनच्या त्रासाचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायग्रेन म्हणजे काय? मायग्रेन कशामुळं होतो? याची लक्षणं काय असतात? यावर काय उपाय आहे? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.

मायग्रेन म्हणजे काय?
मायग्रेन हा एक डोकेदुखीचा विकार आहे. मेंदूच्या कार्यामध्ये काही बदलामुळे उद्भवणार्‍या डोकेदुखीला मायग्रेन असे म्हटले जाते. मायग्रेनच्या त्रासामध्ये डोक्याचा एक भाग प्रचंड दुखतो. हे दुखणे असह्य होते. मेंदूमधील रक्तप्रवाहामध्ये बदल झाल्यास ही डोकेदुखी उद्भवते.

- Advertisement -

मायग्रेनची कारणे कोणती?
मायग्रेनची अनेक कारणे आहेत ज्यामुळे मायग्रेनचा त्रास होण्यास सुरुवात होते. कोणत्याही पदार्थाची अ‍ॅलर्जी, कमी झोप, थकवा, मानसिक तणाव, काही औषधांचे सातत्याने सेवन, वारंवार उपवास करणे, जेवणाच्या वेळा अनियमित असणे, हार्ट ब्लड प्रेशर या कारणांमुळे मायग्रेनचा त्रास होतो. तर सोडायुक्त खाद्यपदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्याने देखील मायग्रेनचा त्रास बळावतो.

मायग्रेनची लक्षणे –
१. मायग्रेनच्या त्रासात डोके दुखीसोबत डोळ्यासमोर अंधारी येणे, डोळे दुखणे
२. पूर्ण डोके किंवा अर्धे डोके दुखणे.
३. मोठा आवाज आणि प्रखर प्रकाशाचा त्रास होणे.
४. भूख कमी लागणे, घाम येणे, थकवा येणे.
५. मळमळणे, उलट्या होणे.

- Advertisement -

मायग्रेनवर घरगुती उपाय –

१. दररोज रिकाम्या पोटी एक सफरचंद खावे. हा प्रयोग काही दिवस केल्याने डोकेदुखीपासून पासून सुटका होते.
२. मायग्रेनचा त्रास होत असल्यास एका सुती कपड्यात बर्फाचे तुकडे घेऊन त्यांनी डोक्याला शेक द्यावा, यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.
३. मायग्रेनवर कापूर हा एक चांगला रामबाण उपाय आहे. तुपामध्ये कापूरच्या काही वड्या मिक्स करून त्याने डोक्याला मसाज करून घ्यावा. यामुळे डोकेदुखी थांबते.
४. लिंबाची साल किसून त्याचा किस वाटून घ्यावा. ही तयार झालेली पेस्ट कपाळावर लावून घ्यावी. यामुळे मायग्रेनपासून आराम मिळण्यास मदत होते.
५. मायग्रेनचा त्रास असणार्‍या व्यक्तीने तुपाचा वापर करावा. ज्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास आहे अशा व्यक्तीने दररोज दोन वेळा नाकामध्ये तुपाचे दोन थेंब घालावेत यामुळे मायग्रेनपासून सुटका होते.
६. मोहरीच्या तेलाचे काही थेंब नाकात सोडावेत, यामुळे मायग्रेनचा त्रास होणे कमी होतो.
७. मायग्रेनचा त्रास होत असल्यास कोबीच्या पानाची पेस्ट तयार करून ती पेस्ट कपाळावर लावल्याने मायग्रेनचा त्रास दूर होतो.

मायग्रेनपासून करा बचाव –

  • मायग्रेनपासून बचाव करण्यासाठी दुपारच्या उन्हामध्ये बाहेर पडू नये.
  • उग्र वासाचे पर्फ्युम आणि अत्तर लावणे टाळावे.
  • दररोज १२ ते १५ ग्लास पाणी पिणे. तसेच तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेऊन सकाळी ते पाणी प्यावे यामुळे
  • मायग्रेनचा त्रास कमी होतो.
  • टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर कमी करणे.
  • पोट रिकामी ठेऊ नये.

    मानसिक तणावामुळे उद्भवतो मायग्रेन
    मायग्रेन या आजारामुळे अनेक तरुण – तरुणी अधिक प्रमाणात त्रस्त झालेले दिसून येत आहेत. मायग्रेनचा त्रास हा जास्त करून तरुणांमध्ये आढळतो. सध्या ७० ते ७५ टक्के मायग्रेनचा त्रास हा मानसिक तणावामुळे होतो. तर मायग्रेन हा कोणत्याही वयात उद्भवतो. अगदी १७ वर्षांच्या तरुणांना सुद्धा याचा त्रास होतो.
    -डॉ. प्रांजल पाटील, होमिओपॅथी कन्सल्टन्ट

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -