घरलाईफस्टाईलअसे बना मिस परफेक्शनिस्ट

असे बना मिस परफेक्शनिस्ट

Subscribe

आपली पर्स मेकअपच्या साधनांनी परिपूर्ण ठेवली तर सदैव फ्रेश राहण्याची किमया तुम्हालाही सहज साधता येईल. तुम्हीही ‘मिस परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळख मिळवू शकता.

अनेकजणी त्यांच्या कामाच्या ठिकाणी सदैव फ्रेश आणि नुकताच मेकअपचा हात फिरवून आल्यासारख्या वाटतात, याचं रहस्य काय असावं? त्यांना कुठला जादाचा वेळ मिळतो, स्वत:ला नीटनेटकं ठेवण्यासाठी? त्यांच्याकडेही इतरांसारखेच कामाचे ठराविक तास असतात; पण त्यांच्या सौंदर्याचं रहस्य दडलंय त्यांच्या पर्समधल्या अगदी साध्या सोप्या गोष्टींच्या वापरात! तुम्हीही या साध्या उपायांवर एक नजर टाकली आणि आपली पर्स अशा मेकअपच्या साधनांनी परिपूर्ण ठेवली तर ही किमया तुम्हालाही सहज साधता येईल.

आता ऑक्टोबर हिट सुरू आहे, तेव्हा घाम येणं आणि चेहर्‍यावर तेलकटपणा जाणवणं, ही समस्या सगळ्यांनाच जाणवते. त्यासाठी फक्त एक वेट टिश्यू पर्समध्ये ठेवून द्या. दोनतीन तासांनी जिथं घाम येत आहे असं वाटेल, तिथं या टिश्यूनं हलकंसं पुसून घ्या. पाहा दोन मिनिटांत फ्रेश वाटेल. त्यासाठी आरशासमोर उभं राहायचीही गरज नाही! लिटमस पेपरचाही उपयोग तुम्ही करू शकता. यामुळे वारंवार तोंड धुण्याची गरज नाही आणि त्वचेवर येणार्‍या पुटकुळ्यांचाही आपोआपच बंदोबस्त होईल. महत्त्वाच्या मीटिंगला जाताना रुमालावर थोडा परफ्यूम फवारून तो रुमाल गळ्यावर, मानेवर फिरवा. या सुगंधामुळे तुम्हाला काम करायला नवा उत्साह मिळेल.

- Advertisement -

लिपस्टिकचा योग्य वापर व्यक्तिमत्त्व खुलवतं. पण सारखं ओठावरून लिपस्टिक फिरवणं प्रशस्त वाटत नाही. अशा वेळी लिपस्टिक लावतानाच फेंट रंगाच्या लिपस्टिकनं आउटलाईन बनवून घ्या. त्यावर गडद रंगाची लिपस्टिक लावल्यानं ओठांना उठाव तर येईलच; पण लिपस्टिक बाहेर जाण्याचा त्रासही वाचेल. चहाच्या वेळी फ्रेश होताना वरून नुसतं लीपग्लॉस फिरवलं तरी पुन्हा लिपस्टिक लावल्यासारखी वाटेल. मात्र चहा, नाश्ता खाण्याबरोबर आपण लिपस्टिक खात नाही ना, याची काळजी जरूर घ्या. अचानक मीटिंगला जाताना मेकअप करायची संधी मिळाली नाही तर ओठांवर हलकासा लिपग्लॉस लावून घ्या. त्यामुळे चेहरा फ्रेश वाटायला लागतो.

डोळ्यांची शोभा वाढविण्यात काजळाच्या पेन्सिलचा वापर केला तर उपयुक्त ठरतो. काजळ घालण्याआधी खालच्या पापण्यांना हलकासा फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट पावडरचा हात लावायला हरकत नाही. त्यावरून काजळाची रेघ काढल्यास ती जास्त वेळ टिकून राहते.

- Advertisement -

हातापायांची योग्य निगाही तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोलाची भर टाकत असते. त्यासाठी योग्य नेलपेंटचा वापर करा. मॅनिक्युअर आणि पॅडीक्युअर महिन्यात एकदा अवश्य करून घ्या. अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतलीत तर तुम्हीही ‘मिस परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळख मिळवू शकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -