घरलाईफस्टाईल'या' उपायांमुळे केस होतील काळे आणि दाट

‘या’ उपायांमुळे केस होतील काळे आणि दाट

Subscribe

काळे आणि दाट केस सौंदर्य अधिकच खुलवतात. त्यामुळे, केस काळे आणि दाट होण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. तर अनेक स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन आपले केस सुंदर राहण्यासाठी वेगवेगळे हेअर मास्क देखील लावतात. पण, काही असे घरगुती उपाय केल्याने तुमचे केस दाट आणि काळे राहण्यासाठी मदत होईल.

तिळाचे तेल

- Advertisement -

तिळाचे तेल केसांसाठी एक उत्तम पर्याय आहे. केसांना जर सुंदर बनवायचं असेल तर केसांना तिळाचे तेल लावावे. तसेच तिळाचे सेवन सुद्धा खूप लाभकारी आहे. त्यामुळे जर तुम्ही आहारामध्ये तिळाचा वापर केल्यास तुमचे केस दीर्घ काळासाठी काळे आणि दाट होतात.

शिकेकाई पावडर

- Advertisement -

केसांसाठी विविध कंपनीचे शम्पू वापरले जातात. पण, त्याजागी तुम्ही शिकेकाई पावडरचा वापर करु शकता.

चहाचं पाणी

केस धुण्या अगोदर एक कप चहाचं पाणी गरम करून त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या मिश्रणाला केस धुण्याच्या १ तास अगोदर लावा. केस काळे होतील.

आलं

आलं चांगले कुटून त्यामध्ये मध मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करावी. ही पेस्ट डोक्याला लावा. हा उपाय केल्याने आपले पांढरे केस काळे व्हायला सुरवात होईल.

कडीपत्ता

कडीपत्ता फक्त पदार्थाचा स्वाद वाढवत नाही तर त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म ही आहेत. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा, असे नियमित केल्यास लवकरच परिणाम दिसू लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -