घर लाईफस्टाईल रिटायरमेंटचा प्लॅन करत असाल तर 'या' चुका करु नका

रिटायरमेंटचा प्लॅन करत असाल तर ‘या’ चुका करु नका

Subscribe

शासकीय अथवा खासगी नोकरी करत असाल. प्रत्येक जण एका काळानंतर सेवानिवृत्तीचा विचार करतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा रिटायरमेंटचा विचार करत असाल तर पुढील काही टीप्स तुमच्या नक्कीच कामी येऊ शकतात. जेणेकरुन रिटायरमेंटचा प्लॅन करतेवेळी किंवा त्यानंतर तुम्हाला समस्या येणार नाही. (Retirement Plan)

-खर्चाचा अंदाज लावा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या खर्चाचा योग्य अंजाद लावला पाहिजे. जर तसे करता आले नाही तर तुम्हाला रिटायरमेंटवेळी समस्या येऊ शकते. अशातच तुम्हाला रिटायरमेंटपूर्वी खर्चासंबंधित प्लॅन करावा लागेल.

- Advertisement -

-महागाई पाहता करा प्लॅन
महागाई दिवसागणिक वाढत चालली आहे. अशातच तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करत असाल तर महागाई पाहून करावा, काही लोकांसोबत असे होते की, महागाईमुळे त्यांचा फंड अपुरा पडतो. त्यामुळे याची काळजी घ्यावी. जेणेकरुन तुम्हाला आणि पत्नीला वृद्धापकाळात समस्या येणार नाही.

-आधीच कर्ज फेडा
जर तुमच्या घराचे कर्ज किंवा एखाद्या प्रकारचे कर्ज घेतले असेल तर ते रिटायरमेंटपूर्वीच फेडा. जेणेकरुन रिटायरमेंटनंतर कर्ज द्यावे लागणार नाही. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेत रिटायरमेंटचा प्लॅन केल्यास कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.


- Advertisement -

हेही वाचा- दीर्घायुष्य हवे मग फॉलो करा ‘हे’ नियम

- Advertisment -