घरलाईफस्टाईलकोपरा आणि गुडघ्याचा काळेपणा 'असा' करा दूर

कोपरा आणि गुडघ्याचा काळेपणा ‘असा’ करा दूर

Subscribe

आपण बऱ्याचदा चेहरा, हात, पाय आणि मानेची काळजी घेतो. कारण शरीरातील हे पार्ट आपले सौंदर्य खुलण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. मात्र, कोपर आणि गुडघ्याचा काळेपणाकडे आपण दुर्क्ष करतो. बऱ्याचदा स्टायलिश शॉर्ट कपडे घातल्यावर हा काळेपणा उठून दिसतो. परंतु, याचा परिणाम थेच तुमच्या लूकवर देखील होतो. त्यामुळे हाताच्या कोपराचा आणि गुडघ्याचा काळेपणा कसा दूर करावा, हे आपण पाहणार आहोत.

हळदीचा पॅक

- Advertisement -

अनेकदा त्वेचेच्या सौंदर्यासाठी हळदीचा वापर केला जातो. त्याप्रमाणे हळदीमध्ये थोडेसे दूध आणि मध घालून त्याची पेस्ट करावी. ही तयार झालेली पेस्ट हाताचा कोपरा आणि पायाचा गुडघ्यावर लावाली. साधारण: वीस मिनिट तसेच ठेऊन नंतर स्वच्छ धुवून घ्यावे. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.

बेकिंग सोडा पॅक

- Advertisement -

बेकिंग सोडा तुमच्या त्वचेवरील धूळ आणि घाण साफ करण्यासाठी फायदेशीर आहे. हा कोपरांवरील काळेपणा काढून टाकतो. याकरता बेकिंग सोडा दुधामध्ये मिसळून त्याची चांगली पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट गुडघा आणि कोपरांवर लावा. हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ करुन घ्या.

बेसन पॅक

एक चमचा बेसन पीठ घेऊन त्यात लिंबाचे काही थेंब घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट काळवंडलेल्या गुडघ्यावर किंवा हाताच्या कोपऱ्यावर लावा. यामुळे काळपटपणा दूर होतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -