घरमुंबईक्रॉफर्ड मार्केट परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात; ४ जण ठार

क्रॉफर्ड मार्केट परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात; ४ जण ठार

Subscribe

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता कॅफेमध्ये एक कार घुसून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पायधुनी पोलीस दाखल झाले आहेत.

जनता हॉटेलमध्ये कार घुसून भीषण अपघात, ४ जण ठार

जनता हॉटेलमध्ये कार घुसून भीषण अपघात, ४ जण ठार

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, 31 August 2020

- Advertisement -

मारुती सुझुकी एस्टीन एक्सआय, गाडी क्रमांक MH02 NA 5325 ही गाडी भरधाव वेगाने क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनाता कॅफेमध्ये घसली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ महिला आहेत तर एक पुरुषाचा समोवेश आहे. मृत व्यक्तीपैकी एकाची ओळख अद्याप पटलेली नाही आहे. तर मोहम्मद जुही, नदिम अन्सारी, कमलेश, मोहम्मद नदिम अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -