घरलाईफस्टाईलकेसगळतीसाठी करा 'या' तेलाचा वापर

केसगळतीसाठी करा ‘या’ तेलाचा वापर

Subscribe

स्वयंपाकात लसूण नाही असे केव्हाच होत नाही. कारण जेवणात लसूण नसेल तर जेवण पूर्ण देखील होत नाही. मारत ही लसूण जेवढी जेवण्यात महत्त्वाची आहे. तेवढीच ही लसूण औषधी देखील आहे. कारण लसूणमध्ये भरपूर पौष्टिक घटक आहेत जे आपल्याला विविध समस्यांशी लढण्यास मदत करतात. त्यातील केसगळती ही एक महिलांची गंभीर समस्या असते. यावर काय करावे असा अनेकदा प्रश्न पडतो. त्याकरता आम्ही तुम्हाला एक खास तेल सांगणार आहोत. ज्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होईल.

असे तयार करा तेल?

सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्यांवरील साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यामध्ये बारीक कापलेले लसूण टाकावेत. बारीक कापलेले लसूण तेलामध्ये योग्य पद्धतीने मिक्स होऊ द्यावे. त्यानंतर मध्यम आचेवर लसूण-तेल काही मिनिटांसाठी गरम करत ठेवा. पण, तेल जास्त वेळ गरम करू नका, कारण लसूण करपण्याची शक्यता असते. त्यानंतर गॅस बंद करून तेल थंड करून घ्या. नंतर एका भांड्यामध्ये तेल गाळून घ्या आणि एका बॉटलमध्ये तेल साठवून ठेवा. अशाप्रकारे घरच्या घरी हे लसूण तेल केसांना लावून चांगले मालिश करा. यामुळे केसगळती होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -