घरलाईफस्टाईलविसराळूपणाला घातक ठरतोय मोबाईल!

विसराळूपणाला घातक ठरतोय मोबाईल!

Subscribe

मेंदूविकारतज्ज्ञांनी निरीक्षण केल्यानुसार मेंदूवर सतत आदळणाऱ्या माहितीमुळे माणसातील विसरभोळेपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

पुर्वी आपले मन मोकळे करण्यासाठी एकमेकांना भेटून संवाद साधला जायचा. परंतु, सर्वत्र डिजिटलायझेशन झाल्याने इंटरनेट आणि स्मार्ट फोन्सच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे मोकळेपणाने होणारा संवाद संपुष्टात आल्याचे चित्र सगळीकडे पहायला मिळते. मनमोकळ्या गप्पा मारणारे माणसं देखील आता मोबाईलमध्ये डोकं खुपसून
जगात काय चालले आहे, हे पाहत असतात. मेट्रोसिटीमध्ये प्रामुख्याने मुंबईत हा प्रकार जास्त पहायला मिळतो. विसरभोळेपणाचे असे अनेक प्रश्न अनेक मुंबईकरांना सध्या पडू लागले आहेत. यापूर्वी मेंदूला थोडा जरी ताण दिला तरी त्यांची उत्तरे लगेच आठवायची ते आता आठवत नाही. मुंबईकरांमध्ये विसराळूपणाच्या तक्रारीचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण सांगते.

दिवसेंदिवस विसरभोळेपणात वाढ

सततच्या मोबाईल वापरामुळे अनेकांना डोळे, कानांच्या आजाराला सामोरे जावे लागते. मेंदूविकारतज्ज्ञांनी निरीक्षण केल्यानुसार मेंदूवर सतत आदळणाऱ्या माहितीमुळे माणसातील विसरभोळेपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कामाच्या ताणातणावांमुळे, व्यग्र वेळापत्रकातून स्वतःला सांभाळताना आणि बदलत्या लाइफस्टाईलमुळे स्मृतीभ्रंश सारख्या आजाराचे प्रमाणदेखील वाढते आहे. महाराष्ट्र टाईम्सने सादर केलेल्या वृत्तानुसार, आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताणतणावांच्या तक्रारी, स्मृतीभ्रंशाचे प्रमाण हे यापुर्वी साधारण वयाच्या पन्नासाव्या वर्षी होतांना दिसत होत्या त्या तक्रारी तीस ते पस्तीस वयोगटात सध्या दिसत आहे.

- Advertisement -

दिवसातील अर्ध्यापेक्षा अधिक काळ मोबाईलचा वापर करणे, रात्री उशीरापर्यंत जागरण करून चॅंटीग करणे, स्क्रीनवर वाचण करणे, फोनवर सतत बोलत रहाणे या सगळ्याचा परिणाम थोडक्यात मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या मेंदूवर होतो. तसेच, स्मृतीक्षमतेवरही होताना दिसतो. मेंदू हा शरिरातील अत्यावश्यक अवयव आहे. म्हणून मोबाईलपासून दूर राहून त्याचा गरजेपेक्षा अधिक वापर करणे टाळले पाहिजे. मानसिक ताणतणाव, कामाचा ताण तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टी, छंद जोपासण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो.

ठराविक असे कोणते वय नाही

विस्मृतीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक ताणतणाव व नैराश्य होय. विस्मृती झाल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ज्या व्यक्तीचा स्मृतिभ्रंश झाला त्या व्यक्तीस घडलेल्या घटना लक्षात न येता त्या घटना पुर्णतः आठवत नाही. स्मृतिभ्रंश झाल्यास व्यक्तीच्या आकलन क्षमतेत कमतरता निर्माण होते. हा आजार होण्यासाठी कोणते ठराविक असे वय नाही. ३० व्या वर्षीदेखील हा आजार होण्याची शक्यता असते. वाढणाऱ्या वयासोबत विस्मृती किंवा स्मृतिभ्रंश
यासारख्या आजारांचा धोका अधिक प्रबळ होऊ शकतो.

- Advertisement -

हे ही वाचा – मुंबईकरांच्या मानसिक ताणाचं कारण सापडलं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -