घरमुंबईथायमेटच्या प्रभावाने आदिवासी शेतकऱ्याच्या बकऱ्या मृत्युमुखी

थायमेटच्या प्रभावाने आदिवासी शेतकऱ्याच्या बकऱ्या मृत्युमुखी

Subscribe

भिवंडी तालुक्यातील सावंदे या गावातील आदिवासी शेतकरी याच्या बकऱ्या माळरानावर चरावयास सोडल्या असता त्यांना थायमेट या विषाची लागण झाल्याने त्यांच्या १३ बकऱ्या तडफडून मेल्या असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भिवंडी तालुक्यातील सावंदे या गावातील आदिवासी शेतकरी याने जोडधंदा म्हणून सापळालेल्या बकऱ्या माळरानावर चरावयास सोडल्या असता त्यांना थायमेट या विषाची लागण झाल्याने त्यांच्या १३ बकऱ्या तडफडून मेल्या असून, अजूनही चार बकऱ्या या गंभीर अवस्थेत घराबाहेर तडफडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सावंदे ग्रामपंचायत हद्दीतील दशरथ गणपत भोईर या आदिवासी शेतकऱ्याने शेतीस जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यास सुरु केला होता. सध्या त्यांच्याकडे पंचवीस बकऱ्या आहेत.

तब्बल १३ बकऱ्या मृत्यूमुखी 

मागील महिन्यात कोन बकरी बाजारातून त्यांनी ६५ हजार रुपयांच्या १२ बकऱ्या खरेदी केल्या होत्या. नित्यक्रमानुसार सायंकाळी बकऱ्या घरालगतच्या माळरानावर शेतात चरावयास सोडल्या असता त्या घरी परतल्यानंतर एका मागून एक बकऱ्या तडफडावयास सुरुवात झाली. काही कळण्याआधीच तब्बल १३ बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. तर चार बकऱ्या या गंभीर अवस्थेत आहेत. याची माहिती रात्री उशिरा माजी सरपंच शरद ठाकरे यांनी दिल्यावर श्रमजीवी संघटनेचे तालुका पदाधिकारी मोतीराम नामखुडा यांनी संपर्क साधल्यावर सकाळी पंचायत समिती पशुधन अधिकारी आर. आर. पाटील यांनी शेलार पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पानसरे यांना घटनास्थळी उपचारासाठी रवाना केले. त्यांनी केलेल्या पाहणीत या बकऱ्यांना थायमेट या विषारी औषधाची लागण झाल्याचे प्राथमिक निरीक्षणातून नोंदविले.

- Advertisement -

नुकसान भरपाईची मागणी 

येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर सर्प येऊ नयेत यासाठी बऱ्याच वेळा थायमेट या विषारी औषधाची बांधावर टाकले असल्याने तसेच ते बकऱ्यांच्या खाण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून या नुकसानामुळे शेतकरी दशरथ भोईर यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे त्यांना पंचायत समिती व आदिवासी प्रकल्प शहापूरमार्फत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी सरपंच शरद ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा –  

आम्ही कधी ‘एअर स्ट्राइक’चे राजकारण केले नाही – खर्गे

- Advertisement -

‘इंजिनाचा एकमेव डबा’ आता शिवसेनेत! शरद सोनवणे शिवसेनेच्या वाटेवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -