घरमहाराष्ट्रपुण्यात भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू; ३ जण जखमी

पुण्यात भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू; ३ जण जखमी

Subscribe

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, अपघातात अहमदनगर येथे राहणाऱ्या सुष्मीत मुथा, अंबरनाथ येथे राहणाऱ्या जानकी नाणेकर तर गुजरात येथे राहणारे मोक्षा बाबूलाल शहा आणि मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या राणी गौर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

नेमके काय घडले?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली फुडमॉल जवळ शनिवारी भीषण अपघात झाला. इर्टीगाने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात खोपोली फुडमॉल जवळील रस्त्यावर शनिवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी झाला आहे. इर्टीगाने भरधाव वेगात पुढे धावणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत जागीच चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

वाचा – एसटीचा प्रवास असुरक्षित; ६ वर्षात १८ हजार अपघात

वाचा – रासायनिक अपघात रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -