घरलाईफस्टाईलभारतातील 'या' प्रसिद्ध खाद्यपदार्थांना बाहेरच्या देशात आहे बंदी

भारतातील ‘या’ प्रसिद्ध खाद्यपदार्थांना बाहेरच्या देशात आहे बंदी

Subscribe

खाण्यापिण्याच्या बाबतीत आपला देश खूप पुढे आहे. येथे, प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात, प्रत्येक पायरीवर आपल्याला विविध प्रकारचे खाद्य मिळते. इतकंच नाही तर बाजारपेठांसह भारतात अनेक ठिकाणं आहेत, जी फक्त खाण्यापिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. खास गोष्ट म्हणजे इथे खाण्यापिण्याबाबत फारसे नियम आणि कायदे केलेले नाहीत. पण भारतात उत्साहाने खाल्या जाणाऱ्या या पदार्थांना परदेशात बंदी आहे.

तसेच तुम्ही मांसाहारी ते शाकाहारी पदार्थ सहज येथे खरेदी करू शकता. त्याचबरोबर काही खाद्यपदार्थ असे आहेत जे मोठ्या उत्साहाने खाल्ले जातात. पण काही भारतीय पदार्थ आहेत जे फक्त भारतातच खाऊ शकतात. कारण इतर अनेक देशांमध्ये या पदार्थांवर बंदी आहे. चला तर मग पाहूया असे कोण कोणते पदार्थ आहेत काय आहेत जे परदेशात खाल्ले जात नाहीत.

- Advertisement -

Jam and Jelly Processing Technologies

1. अमेरिकेत तुपावर बंदी आहे

भारत एक असा देश आहे जिथे तूप आणि तेल मुबलक प्रमाणात वापरले जाते. तुपाशिवाय तयार होणारी डिश भारतात क्वचितच असेल. एकूणच, आपण असे म्हणू शकतो की तूप हे भारतातील एक सुपरफूड आहे. जे आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात. पण परदेशात जेवणात तुपाचा समावेश करत नाही. तसेच याचे सेवन करणे चांगले मानले जात नाही.

- Advertisement -

2. कॅनडामध्ये जेली कँडीजवर बंदी आहे

कॅनडाशिवाय ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही कॅंडीजवर बंदी घालण्यात आली आहे. तेथील तज्ज्ञांचे असे मत आहे की मुले या कँडी जास्त प्रमाणात खातात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

3. फ्रान्समध्ये कॅचअपवर बंदी आहे

फ्रान्ससारख्या प्रसिद्ध देशात कॅचअपवर बंदी घालण्यात आली आहे. तिथल्या शाळांमध्ये केचप अजिबात खाल्ले जात नाही, इथल्या शाळांमध्ये फक्त फ्रान्सच्या पारंपारिक जेवणाचा आस्वाद घेतला जातो. तर फ्रेंच हॉटेल्स आणि कॅफेमध्ये फ्रेंच फ्राईसोबत केचपही दिला जातो.

4. व्हेनिसमध्ये कबाबवर बंदी आहे

भारतातील जुन्या दिल्लीत मोठ्या चवीने खाल्ल्या जाणाऱ्या कबाबवर इटलीतील व्हेनिसमध्ये बंदी आहे. शहराची परंपरा आणि शिस्त कायम राहावी म्हणून 2017 मध्ये तेथील सरकारने हा निर्णय घेतला होता. तिथल्या कोणत्याही दुकानात कबाब मिळणार नाहीत. शहराचे ऐतिहासिक वातावरण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी इटली आणि व्हेनिसमध्ये कोणत्याही प्रकारचे कबाब, ग्रील्ड मीट इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे.


हेही वाचा : ग्रुप टूरला जाताय मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -