घरमहाराष्ट्रगणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; विशेष रेल्वे गाड्यांना 'या' स्टेशनवर मिळणार थांबा

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; विशेष रेल्वे गाड्यांना ‘या’ स्टेशनवर मिळणार थांबा

Subscribe

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ((Ganesh Utsav) कोकणात (Kokan) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशउत्सावासाठी मोठ्या संख्येने चाकरमाणी गावाला जात असतात. त्यामुळे मध्य रेल्वेने (Central Railway) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती उत्सवादरम्यान चाकरमान्यायांना प्रवास सुकर व्हावा यासाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने या बाबत ट्वीटकरून माहिती दिली आहे. तसेच या विशेष रेल्वे गाड्यांना आता पेण स्टेशनवर (Pen Station) थांबा देण्यात आला आहे. (Good news for Ganesha devotees Special trains will stop at this station)

हेही वाचा – केसीआर ही बीजेपीची बी टीम; सोलापूर दौऱ्यावरून संजय राऊतांचा पुन्हा एकदा हल्लाबोल

- Advertisement -

गणपती सणाला गावी जाणाऱ्या लोकांनी संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांपुर्वी विशेष 156 गाड्या  चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या मुंबई ते सांबतवाडी रोड, लोकमान्य टिळक टर्मिनल ते कुडाळ, दिवा ते रत्नागिरी, मुंबई ते महाड दरम्यान धावणार आहे. विशेष गाड्यांच्या 80 फेऱ्यांना पेण स्टेशनवर थांबा देणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे गाडी क्रमांक 01171/72- सीएसएमटी-सावंतवाडी विशेष- 40 फेऱ्या  आणि  गाडी क्रमांक 01153/54- दिवा- रत्नागिरी विशेष- 40 फेऱ्या कोकण मार्गावर धावणार आहेत. 

हेही वाचा – ODI World Cup 2023 : विश्वचषक ट्रॉफीचे अंतराळातून प्रक्षेपण; BCCIकडून व्हिडीओ शेअर

- Advertisement -

विशेष रेल्वे गाड्यांचे बुकींग आजपासून

गणेशोत्सावासाठी सप्टेंबर-2023 मध्ये 156 स्पेशल ट्रेनचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या विशेष ट्रेनचे बुकींग मंगळवार, 27 जून 2023 पासून सुरु होणार आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर हे बुकींग करता येणार आहे. या विशेष गाड्यांच्या थांब्यांचा तपशीलwww.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर बघता येतील किंवा NTES ॲपवरही याचा तपशील उपलब्ध आहे.

156 गणपती स्पेशल ट्रेन

1) मुंबई-सावंतवाडी रोड स्पेशल (40 सेवा) –

01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

01172 स्पेशल सावंतवाडी रोडवरून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

संरचना : 18 स्लीपर क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

2) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (24 सेवा)

01167 स्पेशल एलटीटी वरून 13, 14, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 1.10, 2.10.2023 (12 ट्रिप) रोजी 22.15 वाजता सुटेल आणि  आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी 09.30 वाजता पोहोचेल

01168 स्पेशल कुडाळ येथून 14, 15, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29 आणि  2 आणि 3 ऑक्टोबर ला 10.30 वाजता सुटेल. (12 ट्रिप) त्याच दिवशी 21.55 वाजता एलटीटीला पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा.  माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

संरचना : एक दृतिया वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयन्यान, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 7 सामान्य द्वितीय श्रेणी.

 3) पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष (६ सेवा)

01169 विशेष गाडी 15.09.2023, 22.09.2023 आणि 29.09.2023 रोजी पुण्याहून 18.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता कुडाळला पोहोचेल.

01170 स्पेशल कुडाळहून 17.09.2023, 24.092023 आणि 01.10.2023 रोजी 16.05 वाजता सुटेल आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी 05.50 वाजता पोहोचेल.

थांबे : लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

संरचना : एक दृतिया वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित , 11  शयन्यान, 6 जनरल सेकंड क्लाससह 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन.

4) करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक) – ६ सेवा

01187 स्पेशल 16.09.2023, 23.09.2023 आणि 30.09.2023 (3 ट्रिप) रोजी करमाळी येथून 14.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 02.45 वाजता पनवेलला पोहोचेल.

01188 स्पेशल पनवेलहून 17.09.2023, 24.09.2023 आणि 1.10.2023 (3 ट्रिप) रोजी 05.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.00 वाजता कुडाळला पोहोचेल.

थांबे: थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, काकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, रोहा आणि माणगाव.

संरचना : एक दृतिये वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित , 11 शयन्यान क्लास, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी.

5) दिवा – रत्नागिरी मेमू स्पेशल  (४० सेवा)

01153 स्पेशल दिवा येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दरम्यान 07.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

01154 विशेष गाडी 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दरम्यान 15.40 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी 22.40 वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

संरचना: 12 कार मेमू रेक

6) मुंबई – मडगाव विशेष साप्ताहिक ४० सेवा

01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 11.50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 02.10 वाजता मडगावला पोहोचेल.

01152 स्पेशल मडगावहून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज 3.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

संरचना : 18 शयनयान क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -