घरलाईफस्टाईलस्त्रियांमधील अशक्तपणा

स्त्रियांमधील अशक्तपणा

Subscribe

थोडेसे काम केले की, लगेच काही स्त्रियांना थकवा येतो. हा थकवा आणि अशक्तपणा तुम्हाला कमजोर बनवून कोणत्याच कामाला मन लागू देत नसतो. तुम्ही जरी गरोदर नसाल तरीही अशक्तपणा का येतोय ? तसेच त्याला कसे दूर करता येईल ते आज आपण पाहूया…

अशक्तपणा म्हणजे काय?
रक्तात सामान्य रक्तपेशींपेक्षा कमी पेशी असणे किंवा लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण 10 ग्रॅम / डील यापेक्षा कमी असल्यास स्त्रियांमध्ये अशक्तपणाचा त्रास जाणवतो.

- Advertisement -

अशक्तपणाची कारणे                                                                                                              फॉलीक अ‍ॅसिडची कमतरता, जीवनसत्व ब 12 ची कमतरता, लोह कमतरता, रक्तपेशींचे नुकसान करणारा ठरावीक रोग, वारंवार संक्रमण होणे (जसे हिवताप), काही प्रकारचे अस्थिमज्जा रोग, अपुरा आहार त्यामुळे कुपोषण, गर्भधारणेदरम्यान अपुरा आहार, मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे या कारणांमुळे स्त्रियांमधील अशक्तपणाच्या तक्रारी वाढतात.

अशक्तपणाची लक्षणे
तुम्हाला थकवा जाणवल्यास किंवा छातीत दुखणे, श्वास लागणे, शरीर सुजणे, त्वचा फिकी पडणे आदी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टर्सची भेट घ्यावी.

- Advertisement -

अशक्तपणा दूर करणारे घरगुती उपाय
* गाजरात भरपूर पोषक द्रव्ये असतात, त्यामुळे गाजराचा रस पिल्याने ऊर्जा मिळते.
* झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून सेवन करावे.
* शुद्ध तुपात कांदा भाजून घ्यावा आणि त्याचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे अशक्तपणा दूर होईल आणि फुप्फुसांना फायदा होईल.
* लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती बळकट बनवतात.
* दिवसभर ऊर्जा पातळी राखण्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभर्‍याचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होईल.
* कामाच्या अधिक व्यापामुळे वेळेवर जेवण होत नाही. त्यामुळे जंक फूडचे सेवन अनेकजण करतात; परंतु जंक फूड खाण्याचे टाळावे.
* दीर्घ काळापर्यंत उपाशी राहू नये. प्रत्येक दोन ते तीन तासांच्या अंतराने थोड्या-थोड्या प्रमाणात जेवण करीत राहावे. यामुळे पचनक्रिया चांगली राहील. जेवणानंतर लगेचच झोपू नये, यामुळे जास्त आळस येतो.
* दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते. यामुळे व्यक्ती लवकर थकून जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -