घरलाईफस्टाईलचाळीशीनंतरही मिळू शकतं आई होण्याचं सुख

चाळीशीनंतरही मिळू शकतं आई होण्याचं सुख

Subscribe

असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नीक (एआरटी) च्या मदतीनं आपल्या सुविधेनुसार, आई बनण्याचं सुख प्राप्त करू शकतात. महिलांना २५ व्या वर्षापासून ते ३७ व्या वर्षापर्यंत अंडी फ्रीज करून ठेवता येतात.

सध्या सगळ्याच महिलांना करिअर महत्त्वाचं असतं. त्यामुळं लग्न उशीरा होतात आणि त्यानंतर मुलांना जन्म देण्याचं वयही वाढत चाललं आहे. पण त्यामुळं आई होण्याच्या प्रक्रियेत बऱ्याच अडचणी येतात असं समोर येतं. पण आता महिला असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नीक (एआरटी) च्या मदतीनं आपल्या सुविधेनुसार, आई बनण्याचं सुख प्राप्त करू शकतात. साधारण ३५ वर्षांनंतर प्रजनन क्षमता महिलांमधील कमी व्हायला लागते आणि चाळीशीनंतर अतिशय जलदगतीनं ही क्षमता कमी होते. पण आता भविष्यात मुलांना जन्म देण्यासाठी अर्थात चाळीशीनंतरही मातृसुख उपभोगण्यासाठी आपली अंडी फ्रीज करून ठेवता येऊ शकतात. त्यामुळं चाळीशीनंतरही बाळांना जन्म देऊन आई होण्याचं सुख मिळू शकतं.

कसं आहे एग फ्रिजिंग आणि एग डोनेशन

महिलांमध्ये जन्मापासूनच अंडी असतात. जन्मापूर्वी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासूनच प्रत्येक मुलीच्या गर्भात किती अंड्याचा संचय असतो ही निर्धारित असते. जेव्हा कौमार्य अवस्थेत हार्मोनल बदल होतात, तेव्हा ही अंडी निष्क्रिय असतात. दर महिन्याला अंड्याचा एक गुच्छ अंडोत्सर्गाला आरंभ करत असतो. काही महिलांमध्ये नैसर्गिकरित्या वा अन्य काही कारणांमुळं कमी अंडी बनतात. अंड्यांची मात्रा वाढवण्यासाठी एक आठवड्यासाठी वा अधिक काळासाठी औषधं देण्यात येतात. अंडी निर्माण झाल्यानंतर अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे निरीक्षण करण्यात येतं. त्यानंतर अॅनेस्थेशिया देऊन अंड्यांना सर्जरी करून बाहेर काढण्यात येतं. त्यानंतर १९६ डिग्रीवर नायट्रोजनमध्ये डुबवून फ्रीज करण्यात येतं आणि अशा तऱ्हेनं या अंड्यांचा सांभाळ करण्यात येतो.

- Advertisement -

कधी करावं फ्रिजिंग?

काही महिलांचा असा समज आहे की, अंडी कधीही फ्रीज करता येतात. त्यामुळं त्या ४० व्या वर्षापर्यंत वाट पाहतात. त्यानंतर अंडी फ्रीज करण्याची इच्छा व्यक्त करतात. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो. महिलांना २५ व्या वर्षापासून ते ३७ व्या वर्षापर्यंत अंडी फ्रीज करून ठेवता येतात. या वयात अंड्यांमध्ये चांगली गुणवत्ता असते. साधारण १० अंडी फ्रीज करून ठेवण्याचा डॉक्टर सल्ला देतात. एका सिंगल फ्रोझन अंड्याद्वारे बाळाला जन्म देण्याची संभावना ही साधारणतः २.१२ टक्के इतकी असते. मात्र दोनपेक्षा अधिक अंडी फ्रीज झाल्यास, बाळ दगावण्याची शक्यतादेखील असते.

कोणत्या महिलांसाठी उपयोगी?

१. लग्नापूर्वी करिअर बनण्यासाठी महत्त्वाकांक्षी असतात अशा महिलांसाठी
२. योग्य जीवनसाथी मिळाला नाही अशा महिला
३. कॅन्सर असलेल्या महिला आपल्या कीमोथेरपीच्या आधी अंडी फ्रीज करून ठेऊ शकतात. कारण रेडिओथेरपी ही अंड्यांसाठी घातक असते
४. मासिक पाळी लवकर संपण्याचा पारंपरिक इतिहास असल्यास, अशा महिला अंडी फ्रिज करून ठेऊ शकतात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -