घरदेश-विदेशहैदराबादमध्ये इसिसशी संबधित दोघांना अटक

हैदराबादमध्ये इसिसशी संबधित दोघांना अटक

Subscribe

इसिसच्या संपर्कात असलेल्या आणि दक्षिण भारतात घातपाताच्या तयारीत असलेल्या दोन तरूणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी अटक केली. हे तरुण दहशतवादी कारवायांसह हैदराबादमध्ये इसिसचा प्रसार करण्याचे काम करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून आज हैदराबाद येथे दोन तरुणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. हैदराबादसह दक्षिण भारतात विविध ठिकाणी घातपात तसेच दहशतवादी कारवाई करण्याची तयारी हैदराबादमध्ये सुरू असल्याची माहिती एनआयएला मिळाली. माहिती मिळताच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी हैदराबादमध्ये तपास केला. त्यानंतर त्यांना दोन आरोपी सापडले आहेत. मोहम्मद अब्दुल्लाह बसित (२४), मोहम्मद अब्दुल कादीर (वय १९) अशी या दोन तरुणांची नावे आहेत.

काय करत होते ते दोघे

दहशतवादी कारवायांसह हे दोन तरुण हैदराबादमध्ये इसिसच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करत होते. तसेच हे दोन तरुण हैदराबादमधील इतर काही तरुणांना इसिसच्या जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात होते. त्या दोघांच्या देशविरोधी तसेच सुरक्षेसंबधी कारवाया सुरू होत्या. बसितविरोधात हैदराबाद पोलिसांनी चार्जशीटदेखील दाखल केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार बसीत इसिसचा मोठा दहशतवादी अदनानच्या संपर्कात आहे. त्याचे अनेक साथीदार इसिसला दक्षिण भारतात वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

 


दोन वर्षांपासून सुरू होता तपास 

बसित हा दोन वर्षांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर होता. दोन वर्षांपूर्वी इसिसशी संबंधित तीन तरुणांना नागपूर विमानतळावरून अटक करण्यात आली होती. हे तीन तरुण देशात तरुणांना दहशतवादी हल्ल्यांचे प्रशिक्षण देत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हे तरुण ज्या गटात होते, त्याच गटात बसितदेखील होता. तसेच नंतर कादीरदेखील त्यांच्या संपर्कात आला. महत्वाचे धागेदोरे हाती लागल्यामुशे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी बसित आणि कादीरचा तपास करत होते. आज राष्ट्रीय तपास यंत्रणेने हैदराबादमध्ये सात ठिकाणी छापे मारले. त्यामध्ये आठ संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते. बसित आणि कादीर अट्टल गुन्हेगार असले तरी इतर सहा जणांबाबत अधिक तपास सध्या सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -