घरमहा @२८८चेंबूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १७३

चेंबूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १७३

Subscribe

चेंबूर (विधानसभा क्र. १७३) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

चिंबोरी अर्थात खेकड्याच्या नावावरून या भागाचं नाव चेंबूर असं पडल्याचं सांगितलं जातं. मुंबई उपनगरातला हा शेवटचा मतदारसंघ असून इथे कोकणी चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मात्र, १९६२पासून ते २०१४पर्यंत एकदाही इथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला नव्हता. काँग्रेस आणि भाजप यांच्यातच फिरत राहणाऱ्या इथल्या मतदारांनी पहिल्यांदा २०१४मध्ये शिवसेनेच्या पारड्यात मत टाकलं. आणि तेही काँग्रेसचे तगडे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांना पराभूत करत! चेंबूरमध्ये घाटला, माहुल अशा सर्व विभागात मिळून पालिकेचे ५ प्रभाग आहेत. तिथे शिवसेनेचे २, काँग्रेसचे २ आणि भाजपचा एक नगरसवेक आह. चेंबूरमधील अनधिकृत बांधकामे, प्रकल्पबाधितांचे प्रश्न, रस्त्यांची कामं, स्वच्छता, माहुलवासीयांचे प्रश्न या मुद्द्यांवर अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. या मतदारसंघात एकूण २८५ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १७३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,५०,३३१
महिला – १,२९,२५२

- Advertisement -

एकूण मतदार – २,७९,५८५


prakash Phatarpekar
प्रकाश फातर्पेकर

विद्यमान आमदार – प्रकाश पातर्पेकर, शिवसेना

शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेले प्रकाश फातर्पेकर २००७मध्ये मुंबई महानगर पालिकेवर निवडून आले. तिथे स्थापत्य समिती, सुधार समिती, आरोग्य समिती अशा विविध समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून भूमिका निभावली. मात्र, २०१४मध्ये थेट विधानसभेची उमेदवारी मिळवत चंद्रकांत हांडोरेंचा पराभव केला.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) प्रकाश पातर्पेकर, शिवसेना – ४७,४१०
२) चंद्रकांत हांडोरे, काँग्रेस – ३७,३८३
३) दीपक निकाळजे, रिपाइं(ए) – ३६,६१५
४) सारीका सावंत, मनसे – ५८३२
५) रवींद्र पवार, राष्ट्रवादी – ३९३३

नोटा – ३८९४

मतदानाची टक्केवारी – ४९.८९ %


हेही वाचा – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -