घरमहा @२८८सिल्लोड विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १०४

सिल्लोड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०४

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड (विधानसभा क्र. १०४) विधानसभा मतदारसंघ आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची चर्चा चांगलीच रंगली होती. सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबद लोकसभेची जागा पक्षाकडे मागितली होती. मात्र काँग्रेसने औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी भाजपची वाट धरली. सिल्लोड मतदारसंघ हा जालना लोकसभेत येतो. सिल्लोडमधून जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. नाराज अब्दुल सत्तार यांनीच हे लिड मिळवून दिल्याची चर्चा जालना जिल्ह्यात आहे.

मतदारसंघ क्रमांक – १०४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,५०,४७४
महिला – १,२८,०००
एकूण मतदान – २,७८,८८७

- Advertisement -

विद्यमान आमदार – अब्दुल सत्तार नबी, काँग्रेस

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले आणि मोलमजुरी करुन शिक्षण पुर्ण केलेले अब्दुल सत्तार हे स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आमदार झाले. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सिल्लोड ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत जिंकली होती. त्यानंतर १९९४ साली सिल्लोड नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणूकीत विजय मिळवून पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान देखील मिळवला होता. १९९९ पासून ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचे स्वप्न पाहत होते. मात्र १९९९ साली काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले होते. त्यानंतर २००४ साली काँग्रेसने त्यांना तिकीट दिले, मात्र अवघ्या ३०१ धावांनी ते पराभूत झाले होते. २००७ साली काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली.
२००९ साली काँग्रेसने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांशी जुळवून घेत सत्तार यांनी विधानसभेला विजय प्राप्त केला. २०१४ साली देखील मोठ्या बहुमताने त्यांनी पुन्हा विजय मिळवला होता. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांचे काँग्रेस पक्षासोबत संबंध ताणले गेले आहेत. सत्तार भाजपमध्ये जाण्यास इच्छूक आहेत. मात्र भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सत्तार यांना विरोध आहे. या परिस्थितीत सत्तार शिवसेनेची वाट धरू शकतात किंवा अपक्ष निवडणूक लढवतील? अशी चर्चा आता सिल्लोडमध्ये होत आहे.

Sillod MLA Abdul Sattar
आमदार अब्दुल सत्तार

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अब्दुल सत्तार, काँग्रेस – ९६,०३८
२) सुरेश बनकर, भाजप – ८२,११७
३) सुनील मीरकर, शिवसेना – १५,९०९
४) दिपाली काळे, मनसे – ३४६५
५) नोटा – ३११६


हे वाचा – जालना लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -