घरताज्या घडामोडीमुंबईत १ नोव्हेंबरपासून दहा दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबईत १ नोव्हेंबरपासून दहा दिवस १० टक्के पाणीकपात

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे या दहा दिवसांत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे.

सदर तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबई महापालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महापालिकेस होणाऱया पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सदर दहा दिवसांत आवश्यक पाण्याचा साठा करून त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

जून महिन्यात सुद्धा मुंबईत १० टक्के पाणी कपात करण्यात आलं होतं. तसेच मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं होतं. म्हणावा तसा पाऊस न झाल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागलं होतं. सात तलावांमध्ये दहा टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता.


हेही वाचा : सांगोल्याजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात, मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -