घरमहाराष्ट्रपोलिसांसाठी १५५ कोटींचा निधी मंजूर

पोलिसांसाठी १५५ कोटींचा निधी मंजूर

Subscribe

रत्नागिरी येथील पोलीस विभागाच्या जमिनीवर असणाऱ्या पोलीस वसाहतीचा पुनर्विकास व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरता १५५ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

रत्नागिरी येथील पोलीस विभागाच्या जमिनीवर असणाऱ्या पोलीस वसाहतीचा पुनर्विकास व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरता १५५ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती म्हाडाचे माननीय अध्यक्ष उदय सामंत यांनी आज, बुधावार दिली. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. म्हाडाला शासनाने हा खर्च परत करण्याच्या अटीवर ही मान्यता देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे संकल्प चित्र, आराखडे, नकाशे, अंदाजपत्रक तयार करणे, आवश्यक परवानग्या प्राप्त करणे, कामावर देखरेख ठेवणे यासाठी प्रकल्पाच्या कॉर्डिनेशनची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकूण ५६० सदनिकांचा पुनर्विकास आणि पायाभूत विकास अपेक्षित आहे. त्यामध्ये रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग अशा दोन्ही ठिकाणच्या सदनिकांचा समावेश आहे.

गिरणी कामगारांना दिलासा

गिरणी कामगारांना म्हाडामार्फत विक्री करण्यात आलेल्या सदनिका ५ वर्षानंतर विक्री करता येऊ शकतील, असा निर्णयही घेण्यात आला. पूर्वी या सदनिका १० वर्षापर्यंत विक्री करता येत नव्हत्या, असे सामंत यांनी सांगितले. गिरणी कामगारांना घर विकताना ज्या व्यक्तीकडे १५ वर्षांचा अधिवासाचा दाखला आहे, अशा व्यक्तीलाच घर विकता येणार आहे.

- Advertisement -

सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत

सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या पुरामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यामुळे या पूरग्रस्तांना मदतीसाठी म्हाडातर्फे १० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -