घरदेश-विदेशआता मुंबईतील 'या' पाच रस्त्यांवर 'नो पार्किंग'

आता मुंबईतील ‘या’ पाच रस्त्यांवर ‘नो पार्किंग’

Subscribe

मुंबईतील २६ मोठ्या वाहनतळांशेजारील ५०० मीटर परिसरात वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील ५ मोठ्या रस्त्यांवर पार्किंग बंदी जाहीर केली आहे.

मुंबईतील २६ मोठ्या वाहनतळांशेजारील ५०० मीटर परिसरात वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील ५ मोठ्या रस्त्यांवर पार्किंग बंदी जाहीर केली आहे. चर्चगेटमधील महर्षी कर्वे मार्ग, एस.व्ही.रोड, दादरचा गोखले मार्ग, न्यू लिंक रोड तसेच लालबहादूर शास्त्री या पाच रस्त्यांवर पार्किंग बंदी केली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील सर्व बेस्ट थांब्यांच्या दोन्ही बाजुला ५० मीटर याप्रमाणे १०० मीटरच्या परिसरात नो पार्किंग घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी वाहने उभी केल्यास १० हजारांचा दंड केला जाणार असून याची अंमलबजावणी येत्या ३० ऑगस्टपासूनच होणार आहे.

हेही वाचा – नो पार्किंगमधून 3,943 वाहनांवर रेल्वेची कारवाई

- Advertisement -

सुरळीत वाहतुकीसाठी निर्णय

मुंबईतील वाहतुक अधिकाधिक सुरळीत, गतिमान आणि शिस्तबद्ध व्हावी; तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम व्हावी, या उद्देशाने मुंबई महापालिका येत्या ३० ऑगस्ट २०१९ पासून मुंबईतील महत्त्वाच्या पाच रस्त्यांचा काही भाग प्रायोगिक तत्वावर ’पार्किंग मुक्त’ करण्यात येणार आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग आणि गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग, पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग, न्यू लिंक रोड या रस्त्यांच्या सुमारे १४ किमीच्या अंतराच्या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजू’पार्किंग मुक्त’असणार आहेत. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पाच रस्त्यांच्या काही भागात राबविण्यात येणार्‍या ‘पार्किंग बंदी’सह मुंबईतील सर्व बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ५० मीटरच्या परिसरात ‘नो पार्किंग’अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी संबंधित परिमंडळीय सह आयुक्त तथा उपायुक्त आणि विभागीय सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत.

पार्किंग मुक्त रस्त्यांची नावे

महर्षी कर्वे मार्ग: दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशन ते ऑपेरा हाऊस या दरम्यानच्या सुमारे साडे तीन किलोमीटर अंतरावर
गोखले मार्ग: दक्षिण मुंबईतीलच दादर परिसरात असणार्‍या गोखले मार्गावर पोर्तुगिज चर्च ते एल.जे.जंक्शन दरम्यानच्या मार्गावर
लाल बहादूर शास्त्री मार्ग: पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर कल्पतरु ते निर्मल लाईफस्टाईल या दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटर अंतरावर
स्वामी विवेकानंद मार्ग: पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्गावर जुहू एअरपोर्ट ते ओशीवरा नदीपर्यंतच्या ६ किलोमीटरच्या अंतरापर्यंत
न्यू लिंक रोड:पश्चिम उपनगरातील’न्यू लिंक रोड’वर डी.एन.नगर मेट्रो स्टेशन ते ओशीवरा नदी पर्यंतच्या सुमारे २ किलोमीटरच्या अंतरावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -