घरमहाराष्ट्रआईचा मोबाईलला नकार; मुलाची आत्महत्या

आईचा मोबाईलला नकार; मुलाची आत्महत्या

Subscribe

आईनं नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्यानं २३ वर्षाच्या तरूणानं आत्महत्या केली आहे.

तरूणाईमध्ये दिवसेंदिवस मोबाईलचं फॅड वाढताना दिसत आहे. नवीन नवीन कंपन्यांचे मोबाईल रोज मार्केटमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे नया कुछ ट्राय करते है असं म्हणत अनेक जण आता नवीन मोबाईलला पसंती देताना दिसतात. पण, या मोबाईलमुळे काहींनी आपला जीव देखील गमावला आहे. असाच प्रकार जळगावमध्ये देखील समोर आला आहे. आईनं मोबाईल देण्यास नकार दिल्यानं २३ वर्षाच्या तरूणानं चक्क ट्रेनखाली उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे. सुमेध काकासाहेब भालेराव असं या तरूणाचं नाव आहे. सुमेध हा हिराशिवा कॉलनी, जळगाव येथे राहणारा आहे. सुमेधकडे यापूर्वीच दोन मोबाईल होते. पण, त्यानंतर देखील त्यानं आणखी एका मोबाईलसाठी आईकडे हट्ट धरला. पण, आईनं आणखी मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला. त्यावरून आई आणि सुमेधमध्ये कडाक्याचं भांडण झालं. अखेर सुमेधनं मंगळवारी रात्री ११ वाजता रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -