Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र भंडाऱ्यातील आदिवासी आश्रमशाळेतील 37 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; 4 गंभीर

भंडाऱ्यातील आदिवासी आश्रमशाळेतील 37 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; 4 गंभीर

Subscribe

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून (Bhandara News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील येरली (Yerli) येथील आदिवासी आश्रम शाळेतील 37 विद्यार्थ्यांना गुरुवारी (24 ऑगस्ट) जेवणातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांवर उचपार सुरू असून 4 जणांची प्रकृती गंभीर धक्यादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होत आहे. (37 students of tribal ashram school in Bhandara poisoned by food 4 Serious)

मिळालेल्या माहितीनुसार, येरली येथील आदिवासी आश्रमशाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येते. या आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण दिले जात असून तिथे सुमारे 325 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहे. सर्व विद्यार्थ्यांना गुरूवारी नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास जेवण देण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – Rain Update : पावसाने मारली दडी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

बटाटा, वाटाणा, भात, वरण, चपाती या प्रकारचं विद्यार्थ्यांनी भोजन केलं. मात्र थोड्यावेळाने त्यांच्या पोटात दुखायला लागलं तर, काही विद्यार्थ्यांना चक्कर आली. विद्यार्थ्यांनी ही गोष्ट शाळेच्या शिक्षकांकडे केली, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर संध्याकाळच्या विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलटीचा अधिकच त्रास जाणवू लागला आणि हळूहळू आणखी विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले.

- Advertisement -

पोटदुखी व उलटीचा त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत 11 ते 17 या वयोगटातील 37 विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून उर्वरित 33 जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या तयारीत मनसेची आघाडी; लढवणार ‘इतक्या’ जागा

आदिवासी शाळेत 325 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत असल्याने सर्वांना दुपारचे तयार केलेले भोजन एकत्र देण्यात आले होते. त्यामुळे जेवणातून विषबाधा होणाऱ्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी रुग्णालयात जावून डॉक्टरांकडून माहिती घेत विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी केली.

- Advertisment -