घरमहाराष्ट्रआंबेगावात बिबट्याच्या हल्ल्यात ७ जण जखमी

आंबेगावात बिबट्याच्या हल्ल्यात ७ जण जखमी

Subscribe

पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात रात्रीच्या सुमाराम ऊसाच्या शेतातून अचानक बाहर आलेल्या बिबट्याने नागरिकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत.

सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वास्तव्य करणाऱ्या बिबट्याचा वावर गेल्या अनेक दिवसांपासून लोकवस्तीत होत आहे. आपल्या अन्नाच्या शोधात लोकवस्तीत येत असताना मानवी जीवनाचा या बिबट्याला मोठा आढथळा बनत असताना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात रात्रीच्या सुमाराम ऊसाच्या शेतातून अचानक बाहर आलेल्या बिबट्याने नागरिकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत.

बिबट्याला पकड्यासाठी २ पिंजरे लावले

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी नागरिकांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना रेबीज लस देण्यात आली आहे. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने २ पिंजरे लावले आहेत, अशी माहिती घोडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी दिली. गुरुवारी रात्री घोडेगाव परिसरातील ऊसाच्या शेतातून अचानकपणे बिबट्या बाहेर आला. त्यामुळे तेथून मोटारसायकलवरुन जाणारे दुचाकीस्वार घाबरले. घाबरुन ते जमिनीवर पडल्याने बिबट्याने त्यांना पंज्याने जखमी केले.

- Advertisement -

बिबट्याच्या हल्लात शेतकरी जखमी

  • सागर क्षीरसागर (वय २५, रा. घोडेगाव)
  • निलंबर झाकडे (वय ३५, रा. घोडेगाव)
  • उत्तम टेकवडे (वय ५५, रा. अमोंडी)
  • राम बिबवे (वय ४२, रा. अमोंडी)
  • सुशांत फलके (वय २०, रा. अमोंडी)
  • अमोल काळे (रा. धोंडमाळ)
  • राजू काळे (रा. घुलेवाडी)

दरम्यान, धोंडमाळ आणि हॉटेल सह्याद्रीजवळ बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटून जखमींना नागरिकांना धीर दिला.

दिड महिन्यांपूर्वी घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाजवळ डॉ. अतुल चिखले यांच्या शेताजवळ आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतरही बिबट्याचा वावर असल्याने पहाटे, सकाळी किंवा सायंकाळी व्यायामासाठी फिरणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी बिबट्याची मादी दोन पिल्लांसह फिरत असल्याचे सांगितले. जर मादीची पिल्ले चुकून पिंजऱ्यात सापडली, तर मादी चिडून हाहाकार करेल. यासाठी बिबट्या जेरबंद करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना सावधानता बाळगावी.
– योगेश महाजन, वन परिक्षेत्र अधिकारी, घोडेगाव

- Advertisement -

बिबट्यापासून असे व्हा सावधान

घोडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना बिबट्यापासून विशेष काळजी घ्यावी. कधीही बिबट्याचा पाठलाग करु नये. त्याला जखमी करु नये. तो उलट हल्ला करु शकतो. मुलांना एकटे सोडू नये. मुलांनी घोळक्‍याने फिरावे. बिबट्या दिसल्यास जोरात-ओरडा करावा. खाली वाकू नये. लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांना एकट्याला सोडू नये. गावाजवळ मोकाट कुत्रे, बकऱ्या आणि डुकरं यांची संख्या कमी करणे. गुरे रात्रीच्यावेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त राहील याची काळजी घ्यावी. बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास नजिकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास संपर्क साधावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -