घरताज्या घडामोडीAmaravati Corona : अमरावतीत ७६ नव्या रुग्णांची नोंद; कारागृहातील ८ कैदांचाही समावेश

Amaravati Corona : अमरावतीत ७६ नव्या रुग्णांची नोंद; कारागृहातील ८ कैदांचाही समावेश

Subscribe

अमरावतीत गेल्या २४ तासात ७६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून बाधितांची संख्या ३ हजार ८४२ इतकी झाली आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज देखील अमरावतीत गेल्या २४ तासात ७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये अमरावती कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या आठ कैद्यांचा समावेश असून इतर कोरोनाबाधित वेगवेगळ्या तालुक्यातील आहेत.

याठिकाणी आढळून आले कोरोनाबाधित

तिवसा तालुक्यात असलेल्या तळेगाव ठाकूर येथील ३, मोझरी येथे ३ तर शेंदोंळा बुजुर्ग येथे सुद्धा १ रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दर्यापूर तालुक्यातील ५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. येवदा येथील २ सामगा येथील १, कमळापूर येथील १ तर दर्यापूर ग्रामीण मधून १ महिला कोरोनाबाधित रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यात मोझरी, चांदूरबाजार येथील कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या व्यतिरिक्त अमरावती शहरातील वेगवेगळ्या नगरात कोरोनाबाधित आढळून आले असून बडनेरा येथे सुद्धा कोरोनाबाधित आहेत. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ९५ जणांचा मृत्यू झाला असून सध्या १ हजार १७५ रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. तर २ हजार ४९६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ हजार ८४२ इतकी झाली आहे.

- Advertisement -

राज्यात ८,४९३ नवे रुग्ण

राज्यात ८ हजार ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,०४,३५८ झाली आहे. राज्यात १,५५,२६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर आज ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज पर्यंत एकूण ४,२८,५१४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.९ % एवढे झाले आहे.


हेही वाचा – Pune Corona: पुण्यात गेल्या २४ तासात १०४९ जण ‘कोरोना’मुक्त; ८३५ नवे रूग्ण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -