घरCORONA UPDATECorona Live Update: औरंगाबादमध्ये मृत रुग्णांची संख्या ५९१ वर

Corona Live Update: औरंगाबादमध्ये मृत रुग्णांची संख्या ५९१ वर

Subscribe

औरंगाबादमध्ये मृत रुग्णांची संख्या ५९१ वर

औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना एका ३ वर्षाच्या कोरोनाबाधित मुलाचा कोरोनाने बळी घेतला आहे. या मुलासह जिल्ह्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या ५११ झाली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

मुंबईत ७५३ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या २४ तासांत ७५३ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २९ हजार ४७९ इतकी झाली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४ हजार ३०१ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या १७ हजार ७०७ इतके Active केसेस मुंबईत आहेत. तर ७ हजार १७० जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -


पुण्यात गेल्या २४ तासात १०४९ जण ‘कोरोना’मुक्त

मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू आहे. गेल्या २४ तासात शहरात १०४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात शहरात कोरोनाचे ८३५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर तब्बल ४६ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. पुणे शहरातच मात्र पुण्याबाहेरील ११ जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार ७८५ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


अमरावतीत ७६ नव्या रुग्णांची नोंद; कारागृहातील ८ कैदांचाही समावेश

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज देखील अमरावतीत गेल्या २४ तासात ७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये अमरावती कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या आठ कैद्यांचा समावेश असून इतर कोरोनाबाधित वेगवेगळ्या तालुक्यातील आहेत. (सविस्तर वाचा)


राज्यात ४,२८,५१४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

राज्यात ८ हजार ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,०४,३५८ झाली आहे. राज्यात १,५५,२६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर आज ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज पर्यंत एकूण ४,२८,५१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.९ % एवढे झाले आहे.


नागपूरमधील तीन वर्षीय चिमुरड्यांसह चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे. बिहारीमधील लॉकडाऊन ६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आले.


देशात गेल्या २४ तासांत ५७ हजार ५८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा आकडा २ मिलियन म्हणजेच २० लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आतापर्यंत १९ लाख १९ हजार ८४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्के इतके आहे.


राज्यात २४ तासांत ९३ नवे कोरोनाबाधित पोलीस आढळले असून एका पोलीच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १२ हजार ३८३वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १२६ पोलिसांचा मृत्यू झाला असून ९ हजार ९२९ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या २ हजार ३२८ पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या पोलीस विभागाने दिली आहे.

 


शरद पवारांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी करण्यात आली आहे. पवारांना राज्यात फिरू नका अशी विनंती करणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ५७ हजार ९८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा २६ लाख ४७ हजार ६६४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ५० हजार ९२१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९ लाख १९ हजार ८४३ रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. तसेच सध्या ६ लाख ७६ हजार ९०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती कुटुंब आणि कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावरील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. हे दोन जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक असल्याचे समोर आले आहे. एकूण सहा जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सविस्तर वाचा 


देशात १६ ऑगस्टपर्यंत ३ कोटी ४१ हजार ४०० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी काल दिवसभरात ७ लाख ३१ हजार ६९७ कोरोना नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आसीएमआरने दिली आहे.


देशात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बळींचा आकडा ५१ हजार पार झाला आहे. कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार, देशात आतापर्यंत २६ लाख ४७ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत यापैकी ५१ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून १९ लाख १८ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ७७ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


नागपुरच्या खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती रवी राणा यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याता आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. शनिवारी नवनीत राणा यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर हलवले होते. तसेच शनिवारी राक्षी उशिरा त्यांच्यासह पती रवी राणा यांना प्रकृती सुधारल्यामुळे घरी सोडण्यात आले.


जगात कोरोना व्हायरस विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, आतापर्यंत जगात २ कोटी १८ लाख २३ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ७ लाख ७३ हजारांहून रुग्ण मृत्युमुखी पडले असून १ कोटी ४५ लाख ५८ हजारांहून रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात रविवारी ११ हजार १११ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाख ९५ हजार ८६५ झाली आहे. राज्यात १ लाख ५८ हजार ३९५ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात रविवारी २८८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून २० हजार ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -