घरCORONA UPDATEPune Corona: पुण्यात गेल्या २४ तासात १०४९ जण 'कोरोना'मुक्त; ८३५ नवे रूग्ण

Pune Corona: पुण्यात गेल्या २४ तासात १०४९ जण ‘कोरोना’मुक्त; ८३५ नवे रूग्ण

Subscribe

पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ७४ हजार ९३३ वर पोहचली असून दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ५८ हजार ७०६ रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज

मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू आहे. गेल्या २४ तासात शहरात १०४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात शहरात कोरोनाचे ८३५ नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर तब्बल ४६ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. पुणे शहरातच मात्र पुण्याबाहेरील ११ जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार ७८५ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ७४ हजार ९३३ वर पोहचली असून दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ५८ हजार ७०६ रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या पुणे शहरात एकुण १४ हजार ४४२ रूग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी ७६५ जण हे गंभीर असून त्यापैकी ४६४ रूग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागातील १ लाख १८ हजार ७७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १ लाख ६७ हजार ७९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ४३ हजार ९५४ इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण ४ हजार ३४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६० टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७१.०९ टक्के आहे. दरम्यान, पुणे जिल्हयात रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून ते आता ७६.५७ % पर्यंत पोहचले आहे. तर पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १ लाख २५ हजार १९७ रुग्णांपैकी ९५ हजार ८६५ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २६ हजार ४५० आहे. कोरोनाबाधित एकूण २ हजार ८८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.३० टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७६.५७ टक्के आहे.


Corona Update : राज्यात आज ८,४९३ नवे रुग्ण, २२८ जणांचा मृत्यू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -