घरक्राइमआश्रमशाळेत सातवीच्या विद्यार्थिनीला केले सावज, बलात्कारासारखी गंभीर घटना होऊनही १५ दिवस दडवले...

आश्रमशाळेत सातवीच्या विद्यार्थिनीला केले सावज, बलात्कारासारखी गंभीर घटना होऊनही १५ दिवस दडवले प्रकरण

Subscribe

नाशिक : पेठ तालुक्यातील भुवन येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान अधीक्षक राहुल सुरेश तायडे याने सतावीतील मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांनी बहिणीवर बलात्कार झाल्याचे भावाला समजले. तोपर्यंत आश्रमशाळेच्या अधिक्षिका, मुख्याध्यापक व पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. १५ दिवस होवूनही तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला पोलिसांनी सुरुवातीला छेडछाडीचा गुन्हा दाखल केल्याने अशिक्षिका, पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे.

१६ वर्षीय पीडित मुलगी भुवन येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहते. १५ एप्रिल २०२३ रोजी अधिक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याचे स्थानिक नागरिकांकडून भावास समजले. १६ एप्रिल रोजी तिचा भाऊ आश्रमशाळेत गेला. त्याने बहिणीला विचारणा केली असता तिने आपबिती सांगितली. तिने महिला वसतिगृहाच्या आवारात अधीक्षक तायडे याने बलात्कार केल्याचे सांगितले. याप्रकरणी भावाने मुख्याध्यापक राजू इंगोले यांची भेट घेत बलात्काराबाबत विचारणा केली. मात्र, इंगोले यांनी भावास फक्त लेखी जबाब दिल्याचे सांगितले. त्यावर भावाने मुख्याध्यापकाने विचारणा केली की, बलात्काराच्या घटनेस आठ दिवस उलटले तरी कुटुंबियांना माहिती का दिली नाही, १३ एप्रिल रोजी बहिणीस भेटण्यास आलो तेव्हा माहिती का दिली नाही, बहिणीची वैद्यकीय चाचणी केली आहे का, पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे का. मात्र, मुख्याध्यापक इंगोले यांनी कोणतीही कार्यवाही केली नव्हती. १७ एप्रिलपासून उन्हाळी सुटी सुरु होणार असल्याने आणि बलात्काराची माहिती पोलीस व समाजकल्याण विभागास न देता हे प्रकरण दडपण्याचा संबंधितांकडून करण्यात आला आहे, असा आरोप भावाने केला आहे.

- Advertisement -

१६ एप्रिल रोजी मुख्याध्यापक व पीडित बहिणीला घेऊन पेठ पोलीस ठाणे गाठले. मात्र, त्या दिवशी गुन्हा दाखल झाला नाही. १७ एप्रिल रोजी बाल न्याय समिती, नाशिकच्या मदतीने फिर्याद देण्यास पेठ पोलीस ठाण्यात गेलो. पोलिसांनी बहिणीला फिर्यादी करत दबाव टाकून साधारण जबाब घेतला. २४ एप्रिल रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, नाशिक यांच्या आदेशाने पुन्हा मुलीचा अचूक जबाब घेण्यात आला. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अधीक्षक तायडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (दि.२५) पेठ पोलीस ठाण्याकडून वैद्यकीय चाचणीबाबत संपर्क साधण्यात आला.

भुवन आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पालकांच्या मागणीनुसार मुलीची वैद्यकीय चाचणी जिल्हा रुग्णालयात केली जाईल. दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल. : शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक

प्राथमिक आरोग्य केंद्र, भुवन हे शाळेपासून अवघ्या दीड किलोमीटर असतावर असतानाही १५ दिवस पीडित मुलीची व आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्याध्यापक, महिला अधिक्षिका, चौकीदारांवर बलात्कार गुन्हा दाखल करावा. : पीडित मुलीचा भाऊ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -