घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रAaditya Thackeray : पक्ष फोडूनही तुमचे 400 पार होणार नाही! आदित्य ठाकरेंचा...

Aaditya Thackeray : पक्ष फोडूनही तुमचे 400 पार होणार नाही! आदित्य ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

एरंडोल येथील महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र मेळाव्यात उपस्थित जनसमुदाय पाहून खात्री पटली की, जनतेचा आशीर्वाद आपल्यासोबतच आहे. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी आपला महाराष्ट्र अस्थिर ठेवलाय. रोज नवे वाद, नवी आंदोलनं, अशा स्थितीत महाराष्ट्रात नवे उद्योग येणार कसे? घर पेटवून प्रगती होत नसते.

जळगाव : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा ‘महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंजावात सुरू आहे. आज 15 फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान जळगाव, शिरसोली, कासोदा आणि भडगाव येथे सभा पार पडल्या. या सभेला लाखो शिवसैनिक आणि जळगावकर नागरिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. (Aaditya Thackeray You wont cross 400 even if you break the party Aditya Thackeray attack on BJP)

एरंडोल येथील महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र मेळाव्यात उपस्थित जनसमुदाय पाहून खात्री पटली की, जनतेचा आशीर्वाद आपल्यासोबतच आहे. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी आपला महाराष्ट्र अस्थिर ठेवलाय. रोज नवे वाद, नवी आंदोलनं, अशा स्थितीत महाराष्ट्रात नवे उद्योग येणार कसे? घर पेटवून प्रगती होत नसते. भांडण लावून विकास होत नाही आणि समाजाला विखरून देश पुढे जात नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी, तरुणांच्या मनातला आश्वासक महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र हाच धर्म मानून आपण एकत्र यायला हवं! असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.

- Advertisement -

2024 ला आपली सत्ता आणायची आहे

देशातील अराजकता, अत्याचावर बोलतानाच जनतेला आदित्य ठाकरे यांनी आश्वासित केलं. 2024 हे आपलं वर्ष आहे, आपल्याला पुन्हा आपली सत्ता आणायची आहे. देशातील हे वातावरण भानायक होत चाललं आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. ज्या मंत्र्यांनी महिलांना टीव्हीवर शिव्या दिल्या त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? वाद निर्माण करून ते जिंकतात. राज्यातील चित्र बसल्याचे असेल तर आपल्याला एकच पर्याय “उध्दव बाळासाहेब ठाकरे ‘प्राण जाय पर वचन ना जाये’ हे उद्धव ठाकरे यांच धोरण आहे. त्यामुळे आपल्याला गद्दारांना गाडून आपलं सरकार आणावचं लागेल, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

पक्ष फोडूनही तुमचे 400 पार होणार नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की अपेक्षित असा निकाल आहे. आमच्या बद्दल जो घोळ झाला तोच या ठिकाणी पण केला गेला आहे. अध्यक्ष हे काम करताना पक्षपात करत आहे हे धक्कादायक आहे. बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान त्यांनी केला आहे. पण पक्ष फोडूनही तुमचे 400 पार होणार नाही. शरद पवार जिद्दीने लढत आहेत. शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलंय. आता यांना महाराष्ट्रातील जनता उत्तर देईल. असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा : Crime News: चाललंय तरी काय! गुंडांनीच जेलमधील अधिकाऱ्याला बेदम मारलं; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

स्वामीनाथन यांना भारतरत्न, पण त्यांनी ज्यांच्यासाठी काम केलं त्यांच्यावर अत्याचार

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आदित्य ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, दिल्लीत सेनेचा गरडा पडलाय. कोणाला येवढं रोखण्यासाठी करत आहेत? अन्नदात्याला! जणू काय दहशतवादी आहेत ते. एका सभेत ड्रोनमधून अश्रू धूर सोडले. अरे स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, पण त्यांनी ज्यांच्यासाठी काम केलं त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. हम बोले वो कायदा अशी देशात स्थिती आहे. राममंदिर झाले, पहिले मंदिर फिर सरकार म्हटल होतं. मंदिर झाल्यावर राम राज्य यायला पाहिजे होतं, पण असं शेतकऱ्यांवर लाठी हल्ला करून रामराज्य येणार नाही असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : Prakash Ambedkar: देशात लोकशाहीची हत्या! प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर टीका

दक्षिणेतील राज्यांचे मुख्यमंत्री दिल्ली समोर लोटांगण घालत नाहीत

अखंड दक्षिण भारत दिल्लीत जाऊन आंदोलन करत आहे. आपल्या राज्याचे पैसे परत मागत आहेत. त्यांच्यावरही धाडी पडत असतात, ईडी, सीबीआय सुरू असतं. पण दक्षिणेतील राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली समोर लोटांगण घालत नाही. पण दिल्ली सरकारची एवढी मेहेरबानी आपल्या सरकारवर आहे की, त्यांची दिल्लीत जाऊन हिम्मत होत नाही, आमच्या राज्याचे पैसे द्या म्हणून सांगायची. असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -