घरताज्या घडामोडीTiK Tok Viral Video: अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस!

TiK Tok Viral Video: अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस!

Subscribe

गेली सत्ता...गेले सरकार, जीव झाला कासावीस...अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस?, असे म्हणत सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाणला टोला.

सध्या तरुणाईला टिक टॉक अॅपने चांगलीच भुरळ घातली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर टिकटॉकचा क्रेझ देखील प्रचंड वाढत चालला आहे. आतापर्यंत तरुण मुलं-मुली एखाद्या गाण्यावर किंवा डायलॉगवर व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट करत होते. मात्र, सध्या टिक-टॉकवर भन्नाट असे नावाचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे या व्हिडिओत एखाद्या नावांवरुन उखाणा तयार करुन हे व्हिडिओ टिक टॉक पोस्ट केले जात आहेत.

फडणवीसांची उडवली खिल्ली

टिक टॉकवर सध्या या व्हिडिओने अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. यामध्ये तरुणी – तरुणींचा ग्रुप एकत्र येऊन ‘आला वारा गेला वारा…उडून गेला…’,असे म्हणून एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन लाडाने नाव घेतले जाते. मात्र, ही स्टाईल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना देखील चांगलीच आवडली असल्याचे दिसून येत आहे. सचिन सावंत त्यांनी टिक टॉक स्टाईलने फडणवीसांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, सत्ता गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. वेगवेगळ्या कार्यक्रम आणि सभांमधून देवेंद्र फडणवीस महाविकासआघाडीवर टीका करत आहे. त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी टिक टॉक व्हिडिओ स्टाईलने उत्तर दिले आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीवर बोलत आहेत. ही तीन चाकी रिक्षा आहे. त्यामुळे हे सरकार काही जास्त दिवस टिकाणार नाही, असे माजी मुख्यमंत्री बोलतात. त्यावर सचिन सावंत त्यांना म्हणतात, ‘गेली सत्ता गेले सरकार, जीव झाला कासावीस. गेली सत्ता…गेले सरकार, जीव झाला कासावीस…अहो फडणवीस, काहो फडणवीस, कसं हो फडणवीस?, असे म्हणत सावंत यांनी टिक-टॉकवरुन चांगलाच टोला लगावला आहे.


हेही वाचा – दादर स्थानकात आता नाकावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -