घरमहाराष्ट्रहिवाळी अधिवेशनात ठाकरे गट आक्रमक; 'या' मुद्द्यांवरून सरकारला घेरणार

हिवाळी अधिवेशनात ठाकरे गट आक्रमक; ‘या’ मुद्द्यांवरून सरकारला घेरणार

Subscribe

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु होत आहे. 19 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन आहे. जवळपास 12 हे अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. शिवसेनेतील फूटनंतर स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने काही मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली. या मुद्द्यावरंच आज शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. तसेच शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीका केली.

मुख्यमंत्र्यांना चॅलेंजची करून दिली आठवण

आदित्य ठाकरे म्हणाले की, सर्व प्रथम पहिला मुद्दा कर्नाटक व्याप्त सीमाभाग आहे त्यावर शिंदे फडणवीस सरकार काही बोलत नाही. इथून वेगळी भूमिका घेतली जात आहे, तिथून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे, पण ज्यावर घटनाबाह्य सरकार काहीचं बोलत नाही. महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांवर अजून काही उत्तर आलेलं नाही. मी मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज केल होत की, त्यांनी माझ्य़ासोबत येत मीडियासमोर थेट चर्चा करावी, ते अजून झालेलं नाही, असही ते म्हणाले.

- Advertisement -

तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्रात भयानक पाऊस पडला, सगळीकडे ओला दुष्काळ पडला, पण कुठेच मदत झाली नाही, असे अनेक मुद्दे आहेत जे विधिमंडळात मांडणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

सरकार लवकरचं कोसळणार

हे घाबरट सरकार आहे. ज्यावेळी तिकडच्या मुख्यमंत्र्यांची धमकी आली त्यावेळी इकडचे दोन मंत्री घाबरून गेलेच नाहीत असा आरोप करत हे सरकार करायचं तरी काय, हे महाराष्ट्र सरकार नाही, घटनाबाह्य सरकार आहे, सरकार लवकरचं कोसळणार आहे, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

- Advertisement -

सरकार कोणत्याचं जिल्ह्याचं ऐकत नाही

विदर्भातील अनेक मुद्दे आम्ही मांडू. पायऱ्यांवर उभे राहू आवाज उठवण्याचा प्रयत्न करु पण सरकार कोणत्याचं जिल्ह्याचं ऐकत नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. अधिवेशनाच्या पूर्वीचं विरोधकांची आक्रमकता पाहता आता नव्याने स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार कसं तोंड देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आज रामलीला मैदानावर गर्जना रॅली, ५० हजार शेतकरी होणार सहभागी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -