घरताज्या घडामोडीएमपीडीए कायद्याअंतर्गत दोन सराईत गुन्हेगारांवर कारवाई

एमपीडीए कायद्याअंतर्गत दोन सराईत गुन्हेगारांवर कारवाई

Subscribe

खून व दरोड्याचा प्रयत्न करणे, सराकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आदी गंभीर गुन्हे करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी अटक करून दोघांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दोघा सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली. अनिकेत पंढरीनाथ वाजे (२८, रा.वृषभ हाईट्स सोसायटी, जयभवानी रोड), मनोज ऊर्फ सचिन दत्तू भोजने (३०, रा. सोहम पॅराडाईज, अंबड) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अनिकेत वाजे याने नाशिकरोड परिसरात दहशत कायम रहावी, यासाठी त्याने लूटमार, नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण केली. वाजे याचेवर उपनगर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे,गंभीर दुखापत करण्यासह जबरी चोरी, दरोडा, गृह अतिक्रमण करणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, तडीपार आदेशाचे उल्लंघन करणे आदी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील मनोज भोजने याने अंबड परिसरात दहशत कायम रहावी, यासाठी त्याने लूटमार, नागरिकांना मारहाण करत दहशत निर्माण केली. वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गंभीर दखल घेवून त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई केली आहे. भोजनेवर अंबड पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमणे, दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, स्फोटक पदार्थाने आगळीक करणे, शांतता भंगणे आदी गुन्हे दाखल आहेत.

१८ सराईत गुन्हेगारांची कारागृहात रवानगी

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल, असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणार्‍या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची प्रतिबंधक कारवाई सुरु केली आहे. पोलीस आयुक्तांनी आत्तापर्यंत एमपीडीए कायद्याअंतर्गत १८ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -