घरमहाराष्ट्रनायलॉन मांजा विकल्यास होणार कारवाई

नायलॉन मांजा विकल्यास होणार कारवाई

Subscribe

नायलॉन मांजाची विक्री केल्यास किंवा मांजा वापरल्यास आता जळगावमध्ये त्या व्यक्तींवक कारवाई करण्यात येणार आहे.

मकर संक्रांतीनिमित्त पतंग आणि मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री वाढते. मात्र या नायलॉनमुळे अनेकदा नागरिक आणि पशू-पक्ष्यांना इजा होण्याचे प्रकार घडतात. मोठ्या संख्येने पक्ष्यांना दुखापत देखील होते. नायलॉनमुळे अनेक पक्षी जखमी होतात. या घटनामध्ये वाढ झाली असून याला कुठे तरी आळा बसावा याकरता राज्य सरकारने पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ नुसार अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पंतग शौकिनांनी नायलॉन मांजा वापरु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

मांजा विकल्यास होणार कारवाई

मकरसंक्रांती हा सण तोंडावर आला आहे. या सणात मोठ्या प्रमाणात तरुणाई पतंग उडवतात. मात्र या पतंग उडवणाऱ्यांमुळे अनेकदा पशू – पक्षी जखमी होतात. तसेच या काळाता जखमींमध्ये वाढ देखील होते. याला कुठेतरी आळा बसावा याकरता आता जळगाव येथे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. नायलॉन मांजा वापरल्यास संबंधित विक्रेत्यांवर आणि वापर करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -