घरमहाराष्ट्रMilind Deora यांच्या पक्षप्रवेशानंतर शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर प्रबळ दावेदारी?

Milind Deora यांच्या पक्षप्रवेशानंतर शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर प्रबळ दावेदारी?

Subscribe

मिलिंद देवराच्या पक्षप्रवेशाने श्रीमंत समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदे गट आक्रमक दिसत आहे. पण भाजपामध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहे. सध्या भाजपाचे दक्षिण मतदारसंघातून दावेदार उघडपणे बोलत नसले तरी, पक्षांतर्गत खलबते सुरू असल्याच्या शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी (14 जानेवारी) शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला आहे. आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा असून मी काँग्रेस सोडेन, असे मला कधीही वाटले नव्हते. काँग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे 55 वर्षांचे नाते तोडून मी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे, अशी प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी ठाकरे गटात प्रवेशानंतर दिली. खासदार होऊन, मी मुंबई व राज्याचे योग्य प्रतिनिधीत्व करू शकतो, असे म्हणत मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुका लढण्याचा दावा केला आहे.

मिलिंद देवरा हे 2004 मध्ये पहिल्यांदा दक्षिण मुंबई मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यावेळी मिलिंद देवरा हे 27 वर्षीय सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर दक्षिण मुंबई याच मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले होते. पण, 2014 मध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघात मिलिंद देवरा यांचा पराभव हा शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी केला. यानंतर 2019 पुन्हा एकदा अरविंद सावंत यांनीच मिलिंद देवरा यांचा पराभव केला.

- Advertisement -

हेही वाचा – Ram Mandir वादग्रस्त जागा अजूनही तशीच, बाबरीपासून 3KM दूर राम मंदिर; Sanjay Raut यांचा दावा

2019मध्ये महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलली. शिवसेना-भाजपाचे मुख्यमंत्री पदावरून युतीत बिघाड झाला. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापना केली. महाविकासा आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या असून यात ठाकरे गटाने दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपली प्रबळ दावेदारी केली आहे. यामुळे मिलिंद देवरांना त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्या आल्याचे वाटू लागेल होते. यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत महायुतीतून लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडूक लढण्याचा दावा देखील पक्षप्रवेशानंतर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “वऱ्हाड निघाले दावोसला…”, CM Eknath Shinde यांच्या दौऱ्यावर Aaditya Thackeray यांचे टीकास्त्र

दक्षिण मुंबईत शिंदे गटाकडून प्रबळ दावा

मिलिंद देवराच्या पक्षप्रवेशाने श्रीमंत समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदे गट आक्रमक दिसत आहे. पण भाजपामध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहे. सध्या भाजपाचे दक्षिण मतदारसंघातून दावेदार उघडपणे बोलत नसले तरी, पक्षांतर्गत खलबते सुरू असल्याच्या शक्यता नाकारता येत नाही. जस जशी लोकसभा निवडणुकी जवळ येते, तसे तसे पक्षातंर आणि दावेदार समोर येतील. पण दक्षिण मुंबई मदारसंघातून सध्या तरी शिंदे गटातून मिलिंद देवरा आणि ठाकरे गटातून अरविंद सावंत यांच्या कांटे की टक्कर बघायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -