घरमहाराष्ट्रशिवसेनेनंतर राष्ट्रवादीलाही 'टार्गेट' केलं जाऊ शकत; रोहित पवारांचा विरोधकांवर आरोप

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीलाही ‘टार्गेट’ केलं जाऊ शकत; रोहित पवारांचा विरोधकांवर आरोप

Subscribe

पवार कुटुंबातसुद्धा फूट पडण्याचा विरोधकांचा डाव आहे. असंही रोहित पवार म्हणाले.

शिवसेनेत (shivsena) बंडाळी झाली आणि त्या नंतर राज्याचे बदललेले राजकारण सर्वांनीच पाहिलं पण आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा विरोधकांचा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA rohit pawar) यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवारांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. पवार कुटुंबात फूट पाडण्याचे काम विरोधक करत आहेत असं रोहित पवार म्हणाले.

ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्याच प्रकारे पवार कुटुंबातसुद्धा फूट पडण्याचा विरोधकांचा डाव आहे. असंही रोहित पवार म्हणाले. शिवसेनेनंतर (shivsena) आम्हालाही लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यता सुद्धा रोहित पवार यांनी व्यक्त केली. त्याचसोबत आमच्या कुटुंबात कोणतेही हेवेदावे नाहीत तर आम्हा सर्वांचं उद्दिष्ट्य स्पष्ट असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. दरम्यान रोहित पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर आरोप केले आहेत.

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांना लोकसभेत, अजित पवार (ajit pawar) यांना राज्यात आणि मला सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे. पण विरोधकांनी ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबातसुद्धा फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटत आहे. शिवसेनेनंतर आम्ही विरोधकांचे पुढील टार्गेट असू शकतो. असा थेट आरोपच आमदार रोहित पवार यांनी केला.

अजित पवार आणि रोहित पवार यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा सुद्धा मागील काळात समोर येत होत्या त्यावर रोहित पवार म्हणाले, अजित पवार यांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचंसुद्धा तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही. असंही रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार, केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट; सहा पिकांच्या MSP मध्ये वाढ

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -