घरदेश-विदेशशेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार, केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट; सहा पिकांच्या MSP मध्ये वाढ

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार, केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट; सहा पिकांच्या MSP मध्ये वाढ

Subscribe

केंद्रीय मंत्रिमंडळाने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. शेतकऱ्यांचा नफा वाढावा याकरता सरकारने ही पावलं उचलली आहेत. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची पूर्तता करण्याकरता आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर पंतप्रधांनानी शेतकऱ्यांना आणखी एक गिफ्ट दिलं आहे. सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (Minimum Support Price) वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, आयएसआय आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत

- Advertisement -

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली की, गहू, मसूर, जव आणि चणे यांसह रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. गव्हाच्या आधारभूत किमतीत ११० रुपये, जव १०० रुपये, चणे १०५ रुपये आणि मसूरवर ५०० रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राईवर ४०० रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. सूर्यफुलाच्या किमतीतही प्रतिक्विंटल २०९ रुपयांची वाढ झाली आहे.

एमएसपी समितीने रब्बीच्या सहा पिकांच्या किंमतीत ९ टक्क्यांनी आधारभूत किंमत वाढवण्याची मागणी केली होती. कृषि मंत्रालयानेही या सहा पिकांच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. शेतकऱ्यांचा नफा वाढावा याकरता सरकारने ही पावलं उचलली आहेत. २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची पूर्तता करण्याकरता आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bilkis Bano प्रकरणात मोठा खुलासा, आरोपींच्या सुटकेसाठी दोन आठवड्यांत दिली होती मान्यता

पंतप्रधान शेतकरी सन्मान संमेलन 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पंतप्रधान शेतकरी सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचेही (पीएमकेएसके) उद्घाटन केले. याशिवाय, पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक  योजना – एक राष्ट्र एक पिक याचा शुभारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) अंतर्गत 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता देखील जारी केला. पंतप्रधानांनी कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी ‘इंडियन एज’ हे खतावरील ई-मासिकही प्रकाशित केले. मोदींनी स्टार्टअप प्रदर्शनाच्या संकल्पना पॅव्हेलियनचा आढावा घेतला आणि प्रदर्शनातील उत्पादनांची पाहणी केली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -