घरताज्या घडामोडीबारसूतील आंदोलन तूर्तास स्थगित; मार्ग काढण्यासाठी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम

बारसूतील आंदोलन तूर्तास स्थगित; मार्ग काढण्यासाठी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून बारसू रिफायनरी विरोधात स्थानिकांकडून सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तीन दिवसांसाठी बारसुतील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या अनेक दिवसांपासून बारसू रिफायनरी विरोधात स्थानिकांकडून सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तीन दिवसांसाठी बारसुतील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तीन दिवसांमध्ये माती सर्वेक्षण थांबले नाही तर, पुन्हा आंदोलन सुरु करु, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

आंदोलनकर्त्यामध्ये एकवाक्यता झाली असून, पुढचे तीन दिवस आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यादरम्यान चर्चा करुन तोडगा काढण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे. (Agitation in Barsu suspended for now A three-day ultimatum to the government to find a way out)

- Advertisement -

दरम्यान, आज पोलिसांकडून बारसुतील आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. महिला आंदोलकांना मारहाण झाल्याचा दावा काही आंदोलकांनी केला आहे. पोलीसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न होत असताना देखील आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. भू-सर्वेक्षणाच्या जागेकडे निघालेल्या महिला आंदोलकांना पोलिसांकडून रोखण्यात आले. मात्र यानंतर देखील आम्ही पुढे जाणारच अशी भूमिका शेतकरी महिलांनी घेतली.

सरकारकडून चर्चेचे आश्वासन

- Advertisement -

याप्रकरणी सरकारकडून आंदोलकांच्या प्रतिनिधींना चर्चेचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, उपस्थित आंदोलकांनी चर्चेवर बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले. कारण आंदोलनास्थळी जिल्हाधिकारी आंदोलकांशी चर्चा करत असताना आंदोलकांनी तेथून काढता पाय घेतला.

आंदोलन तीव्र

बारसू रिफायनरी विरोधातलं आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी भू सर्वेक्षण केलं जात असताना आंदोलकांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सरकारच्या वेगवेगळ्या आश्वासनांनंतर देखील माती परिक्षण थांबवण्यावर आंदोलक ठाम आहेत.


हेही वाचा – ऑपरेशन कावेरी : सुदानमधून भारतीयांची दहावी तुकडी मायदेशी रवाना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -