घरमहाराष्ट्रकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन

Subscribe

नेत्यांच्या सभा होतात तर परीक्षा का होऊ शकत नाहीत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोचा संसर्ग पुन्हा धुमाकूळ घालत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० घेण्यात येणार होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचे प्रसिद्धी पत्रक लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी जारी केले आहे. या पत्राकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ‘च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ रोजीच्या पत्राद्रारे आयोगास खालीलप्रमाणे कळविण्यात आले आहे. राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निबंध लावेलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्‍त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल. असे म्हटले आहे.

- Advertisement -

पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकल्यामुळे आंदोलन केले आहे. मोठ्या संख्यने एमपीएसीचे विद्यार्थी आंदोलनासाठी एकत्र आले आहे. राज्यात निवडणूका होऊ शकतात, नेत्यांच्या सभा होतात तर परीक्षा का होऊ शकत नाहीत असा सवाल या आंदोलनकारी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

गोपीचंद पडळकरांचा आंदोलनाला पाठींबा 

राज्यात एमपीएससीच्या परीक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात देतात. १४ मार्चला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा या झाल्या पाहीजेत यामध्ये राजकारण करु नका, राज्य सरकार हे गोंधळलेलेल असल्याचा आरोपही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -